Widgets Magazine
Widgets Magazine

कुलभूषण जाधव प्रकरणाचा आज निकाल

नवी दिल्ली, गुरूवार, 18 मे 2017 (08:56 IST)

भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणाचा निकाल गुरुवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयात लागणार आहे.
 
भारत आणि पाकिस्तानचा युक्तीवाद पूर्ण झाला असून उद्या (गुरुवारी) 3.30 वाजता याबाबत निकाल सुनावला जाणार आहे.
 
सोमवारी झालेल्या सुनावणीत ज्या व्हिडिओच्या आधारावर पाकिस्तान आपली बाजू मांडणार होते, तो कुलभूषण जाधव यांच्या कथित कबुलीनाम्याचा व्हिडिओ कोर्टात दाखवण्यास परवानगी नाकारात आंतरराष्ट्रीय कोर्टानं पाकिस्तानाला मोठा दणका दिला होता.
 
‘रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटक झालेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
 
त्याविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. आंतरराष्ट्रीय कोर्टानं यापूर्वीच कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे.
 
भारताच्या वतीने जेष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी भारताची बाजू भक्कमपणे कोर्टासमोर मांडली. पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचा भंग केला आहे, असा दावा भारताच्या वतीने कोर्टासमोर करण्यात आला.
 
15 एप्रिलला (सोमवारी) दुपारी दीड वाजता सुनावणीला सुरुवात झाली. या सुनावणीचं थेट प्रक्षेपण संयुक्त राष्ट्रसंघाच्या आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या वेबसाईटवर करण्यात आलं.
 
हेरगिरी करत असल्याचा आरोप करत पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. भारताने 8 मे रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल करुन दाद मागितली.
 
त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

संदीप वराळ हत्या प्रकरण मुख्य सूत्रधार कुख्यात गुंड प्रवीण रसाळला अटक

निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार कुख्यात गुंड, प्रविण रसाळ ...

news

राज ठाकरेंची भेट घेतली रामदेवबाबांनी

योगगुरू रामदेवबाबा यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. कृष्णकुंज या राज ...

news

नंदुरबारला मुख्यमंत्र्यांचे आगमन

ग्रामिण रूग्णालयाला भेट देत पाहणी केली आहे. तेथून ते भगदरी येथे आले असून तेथील एका ...

news

बाबा घर विका पण माझ्या कॅन्सरचा इलाज करा : मृत्यूनंतर मुलीचा व्हिडिओ झाला Viral

कॅन्सरशी लढत असलेल्या एका मुलीने आपल्या वडिलांकडे उपचारासाठी मदत मागितली होती. ती ...

Widgets Magazine