1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 29 सप्टेंबर 2021 (16:40 IST)

चिमुकलीने व्हिडीओ गेम खेळताना आव्हान बघून चुंबकाच्या 23 गोळ्या गिळल्या

little girl saw the challenge while playing a video game and swallowed 23 magnet bullets Marathi International News
व्हिडीओ गेम चा नाद खूपच वाईट आहे.अति तिथे माती असे म्हटले आहे.व्हिडीओ गेम च्या नादी लागून कित्येक जणांनी आपला जीव गमावला आहे.अशाच प्रकार एका चिमुकल्या मुलीसह घडला आहे.व्हिडीओ गेम खेळणे चक्क एका चिमुकलीच्या जीवावर बेतले. 
 
इंग्लंडमधील एका शहरातून असे प्रकरण समोर आले आहे जिथे एक मुलगी एक व्हिडिओ गेम खेळणे जड झाले ती मुलगी एक व्हिडिओ गेम खेळत होती त्यावर अचानक तिने यावर एक  आव्हान पाहिले आणि ते आव्हान स्वीकारण्यासाठी, मुलीने चुंबकांच्या तब्बल 23 गोळ्या गिळल्या. यानंतर,असे काहीतरी घडले ज्याची मुलाच्या पालकांनी कल्पनाही केली नसेल. हे सर्व घडले जेव्हा मुलगी सतत तिच्या मोबाइलवर व्हिडिओ गेम खेळत होती.
 
ही घटना इंग्लंडच्या पूर्व ससेक्समधील लेवीस काउंटीची आहे. एका वृत्तानुसार, ही मुलगी सहा वर्षांची आहे. मुलीने तिच्या मोबाइलवर व्हिडिओ गेम चॅलेंज स्वीकारल्यानंतर हे सर्व घडले. मुलीने चुंबकाच्या 23 गोळ्या गिळल्या. यानंतर, मुलीच्या पोटात भयंकर वेदना होऊ लागल्या आणि तिला वारंवार उलट्या होऊ लागल्या.
 
यानंतर, मुलीच्या पालकांनी तिला रुग्णालयात नेले, जेव्हा डॉक्टरांनी तिची तपासणी केली, तेव्हा त्यांचा थरकाप उडाला. त्यांनी ताबडतोब ऑपरेशनचा सल्ला दिला, अन्यथा मुलीच्या जीवाला धोका होता. थोड्याच वेळात डॉक्टरांच्या दलाने चिमुकलीवर शस्त्रक्रिया केली आणि तिच्या  पोटातून एकामागून एक सर्व चुंबक काढून टाकले. डॉक्टरांनी सांगितले की चुंबकामुळे चिमुकलीचे आतडे खराब झाले आहेत.
 
मुलीच्या पालकांनी मुलीच्या खोलीचा शोध घेतला, जिथे त्यांना आणखी बरेच मॅग्नेट सापडले. सुदैवाने मुलीला वेळीच उपचार मिळाले, अन्यथा तिला आपला जीव गमवावा लागला असता. डॉक्टरांनी असेही सांगितले की चुंबकांनी बाळाच्या आतड्यांना नुकसान केले आहे.
 
सध्या, मुलगी आता धोक्याबाहेर आहे पण ती अजूनही काही दिवस रुग्णालयातच राहणार आहे. डॉक्टरांनी मुलीच्या पालकांना असेही सांगितले की भविष्यात मुलीला अधिक व्हिडिओ गेम खेळू देऊ नका कारण पूर्वी असे दिसून आले आहे की यामुळे मुलांना जीव गमवावा लागला आहे.