शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

प्रवाशाने अंगावरील कपडे काढले, विमानातील प्रवाशांना बसला मोठा धक्का

international news
दुबईवरुन लखनऊकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या (IX-194)  विमानातील सुरेंद्र (३५)  प्रवाशाने आपल्या अंगावरील कपडे काढले. विमानातील स्टाफने प्रसंगावधान राखून त्याला लगेच एका ब्लँकेटमध्ये गुंडाळे. पण, या प्रकाराने विमानातील इतर प्रवाशांना धक्का बसला. 

या  प्रवाशाने विमानातील लॉबीत येत आपले कपडे काढले. त्यानंतर तो लॉबीत फिरायला लागला. या कृत्याने बाकीच्या प्रवाशांना धक्का बसला. विमानातील स्टाफने लगेचच सुरेंद्रला एका ब्लँकेटमध्ये गुंडाळले. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सुरेंद्रवर दुबईत स्थित असलेल्या पाकिस्तानी बॉसने त्याचा वरचेवर छळ केल्याने त्याला मानसिक धक्का बसल्याचे सांगितले.

सुरेंद्रचा पाकिस्तानी बॉस त्याचा वरचेवर छळ करत होता. तसेच त्याला सुट्टीही देत नव्हता. सुरेंद्रला वाटले की विमान पाकिस्तानात लँड झाले आहे. त्यामुळे त्याने याचा विरोध दर्शवण्यासाठी आपले कपडे काढले असे सांगितले.