Widgets Magazine
Widgets Magazine

चीनकडून मसूद अजहरसाठी व्हेटो अधिकार वापर

गुरूवार, 3 ऑगस्ट 2017 (17:03 IST)

पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यावर चीनने  खोडा घातला आहे.  अमेरिका आणि फ्रान्सने मसूद अजहरला दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. मात्र चीनने प्रतिबंध करण्याचा (व्हेटो) अधिकार वापरत मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र संघ समितीच्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्याच्या निर्णयावर ३ महिन्यांसाठी तांत्रिक स्थगिती आणली आहे. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात चीनने मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र समितीत विरोध केला होता. 

चीनने मसूद अजहरविरोधातील प्रस्तावाला केलेल्या तांत्रिक विरोधाची २ ऑगस्ट ही शेवटची तारीख होती. तांत्रिक स्थगिती संपण्याआधीच चीनने पुन्हा एकदा प्रस्तावावर तीन महिन्यांसाठी स्थगिती आणण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्थगिती 2 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. चीनच्या या निर्णयामुळे अजहरला आंतरराष्‍ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास अडथळे येत आहेत.  

भारताने मसूद अजहरची संयुक्त राष्ट्राच्या कलम १२६७ अंतर्गत नोंद करण्याची मागणी केली होती.  ज्‍यामुळे त्याच्या स्वतंत्रपणे फिरण्यावर तसेच दौऱ्यावर बंदी घालण्यात येईल. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

दुर्घटनाग्रस्त भारतीय विमानातील 50 वर्षांनंतर मिळाले अवशेष

डॅनियल रोश याला बासोन ग्लेशियरवर मानवी देहाचे काही अवशेष मिळाले आहेत. भारतीय विमानातील ...

news

भ्रष्टाचार झाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांचा सभात्याग, लोकशाहीच्या इतिहासातील पहिलीच घटना - धनंजय मुंडे

विधान परिषदेचे सदस्य किरण पावसकर यांनी देवीपाडा, बोरीवली येथील एसआरए प्रकल्पातील ...

news

नोकरांसाठी त्याने घेतला चक्क बंगला...

कतारमधील राजघराण्याने न्यूयॉर्कमध्ये तब्बल ४१ मिलियन डॉलर म्हणजेच २६५ कोटींचा बंगला खरेदी ...

news

शिवराज सिंह चौहान यांच्यावर नेटकर्‍यांची टीका

राष्ट्रध्वजाच्या निर्मितीमधील प्रमुख शिलेदार असणारे पी. व्यंकय्या यांच्या जयंती व ...

Widgets Magazine