गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बिजिंग , सोमवार, 11 जानेवारी 2021 (12:03 IST)

अंधार असल्याने रस्ता चुकला; चीनकडून सैनिकाला सोडणची मागणी

पूर्व लडाखमधील चुशूल सेक्टरमध्ये असलेल्या गुरंग हिल भागात एका चिनी सैनिकाला भारतीय जवानांनी ताब्यात घेतले होते. पीपल्स लिबरेशन आर्मी या चिनी लष्कराचा हा जवान शनिवारी भारतीय हद्दीत शिरला होता. या सैनिकाला तत्काळ सोडण्याची मागणी चीनकडून करण्याहत आली आहे. अंधार असल्याने तो सैनिक रस्ता चुकला, असे चीनकडून सांगणत आले आहे.
 
पूर्व लडाखच्या चुशूल सेक्टरमधील गुरंग हिल भागात शनिवारी भारतीय लष्कराने चीनच्या एका सैनिकाला पकडले होते. चिनी लष्कराचा हा जवान भारतीय हद्दीत आला होता, त्यावेळी जवानांनी त्याला ताब्यात घेतले होते. या सैनिकाला परत देण्याची मागणी चीनकडून करण्यात  आली आहे.
 
रात्रीच्या अंधारात आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे हा जवान भारत-चीन सीमेवर बेपत्ता झाला होता. त्यानंतर याची माहिती भारतीय लष्करालाही देण्यात आली होती.