शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: न्युयॉर्क , गुरूवार, 23 फेब्रुवारी 2017 (08:54 IST)

ब्रम्हांडातील रहस्यांचा नासा करणार खुलासा

अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने सौरमंडळाच्या बाहेरील ब्रम्हांडाशी  संबधित रहस्यांचा उलगडा करण्याचे संकेत दिले आहेत. यासाठी नासाने (अमेरिकेतील स्थानिक वेळेनुसार) दुपारी १ वाजता न्यूयॉर्कमध्ये पत्रकार परिषदेचेही आयोजन केले आहे. नासाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. या प्रसिद्धीपत्रकात सूर्य आणि 
अन्य तार्‍यांच्या भ्रमणसंबंधी   एक्सोप्लॅनेटशी संबधित रोमांचक माहिती देण्यात आली आहे. 
 
प्रसिद्धीपत्रकात सूर्य आणि दुसर्‍या तार्‍यांसंबंधी नवी माहिती देण्यात येणार आहे. नासाच्या हा कार्यक्रम लाइव्ह दाखवण्यात येणार आहे. नासाच्या हा कार्यक्रम लाइव्ह दाखवण्यात येणशर असून, नासाच्या   वेबसाइटवरही या 
कार्यक्रमाची लाइव्ह माहिती मिळणार आहे. 
 
विशेष म्हणजे नासाच्या या कार्यक्रमात खगोल वैज्ञानिक आणि अवकाश संशोधक भाग घेणार आहेत. या लाइव्ह कार्यक्रमादरम्यान sKNasa  हे हँशटॅग वापरून त्यांना प्रश्नही विचारता येणार आहेत.