बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 10 जानेवारी 2017 (15:23 IST)

कॅलिफोनिर्यातील 'ते' प्राचीन झाड कोसळले

कॅलिफोनिर्यातील भीषण  वादळाने या भागातील प्राचीन म्हणजे १ हजार वर्षापूर्वीच्या झाडाचाही बळी घेतला आहे. हे झाड नुसते प्राचीन नाही तर या झाडाच्या रूंद खोडातून बोगदा काढून कारसाठी रस्ता बनविला गेला होता व त्यामुळे हे ठिकाण विशेष बनले होते. कारसाठी रस्ता तयार केला जात असताना हे प्रचंड झाड रस्त्यात मधेच येत होते. १३७ वर्षांपूर्वी हा रस्ता तयार केला गेला तेव्हा झाड तोडण्याऐवजी त्याच्या भल्या मोठ्या रूंद खोडातून कौशल्याने बोगदा तयार केला गेला होता व त्यातून रस्ता बनविला गेला होता. या बोगद्यातून दररोज हजारो वाहने जात येत असत. इतकेच नव्हे तर पर्यटक आणि प्रवासी यांच्यासाठी हा बोगदा मोठे आकर्षण बनला होता.