गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

पाकिस्तानात मुलांना दूध पाजत नाही आई

पाकिस्तानात अनेक आया आपल्या मुलांना अंगावर दूध पाजत नाही. कुठे परंपरा म्हणून तर कुठे गरिबी म्हणून पण परिणामस्वरूप पाकिस्तानचे भविष्य प्रभावित होत आहे.
 
सात मुलांची आई माह परी बलुचिस्तान प्रांतात राहते. ही जागा खूप हिरवीगार आणि उपजवू आहे. परंतू परीचा दोन वर्षाचा मुलगा भुकेने रडत आहे. परी त्याला चूप करवण्याचा प्रयत्न करत आहे पण भूक मिटल्याशिवाय तो चूप राहणार तरी कसा. परी म्हणते, माझे सर्व मुलं कमजोर आहे, बहुतेक माझे दूध चांगले नाही.
पाकिस्तानातील अधिकश्या आयांचे म्हणणे आहे की मुलांना चहा, जडी-बुटी असलेला काढा किंवा फॉर्मूला दूध पाजायला हवे. हेच येथील मुलांच्या कुपोषणाचे कारण असू शकतं. देशात 44 टक्के मुलं कुपोषणाचे शिकार आहेत.
 
आठव्या मुलाला गर्भात वाढवून राहिली परी सांगते की आमच्या बालोची परंपरेत आम्ही बत्री देतो. ही जडी-बुटी असते. दोन वेळा ही आणि दोन वेळा मी दूध पाजते आणि चहा ही देते. विश्व आरोग्य संघटनाप्रमाणे दिवसातून केवळ दोनदा दूध पाजणे उचित नाही. इतर ठिकाणी असेच होतं. कुणी मुलांना तूप खाऊ घालतात तर कुणी मध तर कुणी ऊस.
 
माह परीची एक आणखी मजबूरी म्हणजे ‍ती दिवसभर कामावर असते म्हणून दूध पाजण्यासाठी वेळच मिळत नाही. तिला वाटतं की मुलांना देण्यात येत असलेल्या पारंपरिक वस्तू तिच्या दुधापेक्षा अधिक फायद्याचा आहे. परंतू तिच्या दोन वर्षाच्या मुलाचे आरोग्य हे खोटं ठरवतं. तो मात्र 5 किलोचा आहे. त्याच्या वयाच्या मुलांचे वजन 10 किलोहून अधिक असावे. याचा प्रभाव त्याच्या मानसिक आणि शारीरिक वृद्धीवर स्थायी रूपाने पडेल.
 
पाकिस्तानच्या चारी प्रांतांमध्ये असे मुलं दिसून येतात. देशात युनिसेफ प्रमुख ऐंगेला कीएर्नी म्हणते की हे एक संकट आहे, एक भयंकर आपत्कालीन संकट. देशात कुपोषित मुलांची संख्या वाढत चाललेली आहे ज्याचे कारण आहे मुलांना आईचं दूध न मिळणे. युनिसेफचे निर्देश आहे की पहिल्या सहा महिन्यापर्यंत केवळ आईचे दूध पाजायला हवे. परंतू पाकिस्तानात केवळ 38 टक्के मुलं असे आहेत ज्यांना पहिल्या सहा महिन्यात आईचं दूध मिळतं. हा आकडा धोकादायक रूपाने कमी आहे आणि यामागे कारण आहे येथील स्थानिक परंपरा, आयांचे कामावर जाणे आणि दूध उद्योगांची आक्रमक मार्केटिंग. येथील डॉक्टरदेखील डेअरी मिल्क पाजण्यावर भर देतात.
 
रजूलची सून शेतात काम करायला जाते आणि ती आपल्या नातवंडाची देखरेख करते. ती म्हणते की डॉक्टरांनी सल्ला दिला आहे की मुलांना नंबर एक ब्रँडचे दूध पाजा. परंतू हा सल्ला रजूलच्या नातीसाठी धोकादायक सिद्ध झाला. स्थानीय स्वास्थ्य अधिकारी इम्तियाज हुसेन यांच्याप्रमाणे लोकांचा गैरसमज आहे की ब्रँडेड दूध मुलांना एनर्जी देतं. ते म्हणतात, डॉक्टरही हेच सल्ला देतात. पण त्यातून अधिकश्या झोलाछाप डॉक्टर असतात ज्यांचे काम केवळ पैसा कमावणे आहे.
 
सरकारचे म्हणणे आहे की त्यांना या समस्याची जाणीव आहे आणि ते प्रयत्न करत आहे की 2018 पर्यंत कुपोषित मुलांची संख्या कमी होऊन 40 टक्के राहिली पाहिजे. परंतू यासाठी कोणतीही नवीन योजना नाही. आणि ज्या योजना सुरू आहे त्या परदेशातून येणार्‍या फंडवर अवलंबून आहे.