शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

लग्नाच्या दोन तासानंतर घटस्फोट

सौदी अरेबिया येथे एक विवाह केवळ दोन तास राहिला. आणि दोन तासानंतरच घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली. कारण नवर्‍यामुलीने एक शर्यत मोडली.
 
एका व्यक्तीने लग्नाच्या दोन तासानंतरच पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. कारण नवर्‍यामुली आपल्या लग्नाचे फोटो स्नॅपचॅटवर आपल्या फ्रेंड्सला शेअर केले होते. नवर्‍यामुलाला राग आला की मुलीने आपली शर्यत तोडली कारण विवाहाचे फोटो किंवा 
 
व्हिडिओ शेअर करायचे नाही हे आधीच ठरले होते.
 
वधूच्या भावाने सांगितले, माझ्या बहिणीत आणि नवर्‍यामुलात लग्नाचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल साईट्स जसे स्नॅपचॅट, इंस्टाग्राम किंवा ट्विटरवर शेअर करायचे नाही असा करार झाला होता. पण माझ्या बहिणीने शर्यत तोडली आणि स्नॅपचॅटवर आपल्या 
 
मैत्रिणींना फोटो पाठवले. यामुळे तिच्या नवर्‍याने लग्न मोडायचा निर्णय घेतला.
 
या निर्णयामुळे दोन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण झाला. काही लोकांना हा निर्णय योग्य असल्याचे वाटले तर काहींचे म्हणणे पडले की अशी शर्यत लावायलाच नको.
 
अलीकडे सौदी अरेबियात घटस्फोटाचे प्रकरण वाढत चालले आहेत. मे मध्ये एका सौदी कानूनविद ने चेतावणी दिली होती की नवीन लग्न लगेचच मोडत चालले आहेत. तरुणांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण 50 टक्के सारख्या चिंताजनक आकड्यापर्यंत पोहचले 
 
आहेत. त्यांनी म्हटले की मतभेद, गैरसमज, जबाबदारी टाळण्याचे प्रयत्न या सर्व कारणांमुळे विवाह मोडले जात आहे. विश्वास नसेल तर विवाह टिकणार तरी कसे.