1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (14:57 IST)

शार्क ने पोहणाऱ्या माणसाला जिवंत गिळले

The shark swallowed the swimmer alive शार्क ने पोहणाऱ्या माणसाला जिवंत गिळले Marathi International News  In Webdunia Marathi
आपण माणसाला मासे खाताना पाहिलं असेल. पण कधी माणसाला मासांनी खाताना पहिले आहे का? ही हृदयद्रावक घटना पाहून सर्वानांच धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियन वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, बुधवारी सिडनी बीचच्या लिटल बे एरिया मध्ये घडली आहे. ज्यात समुद्रात पोहायला गेलेल्या एका व्यक्तीला शार्क माशा ने पकडले आणि त्यामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला.
 
ही घटना सिडनीच्या दक्षिण-पूर्व भागातील एका समुद्रकिनाऱ्याची आहे, जिथे हा माणूस मजा करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर पोहोचला होता, मात्र तो समुद्रकिनाऱ्यावर पोहत असताना अचानक एका शार्कने त्याच्यावर हल्ला केला आणि तो मदतीसाठी आरडाओरडा करत राहिला. पण उभे असलेले लोक तिथे असहायपणे मदत-मदत ओरडत उभा राहिला. काही लोक या घटनेचा व्हिडिओ बनवतानाही दिसले.

शार्कने हल्ला केला आणि अल्पावधीतच पोहणाऱ्याला त्याच्या जबड्यात घेऊन  तुकडे करून गिळले. या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, काही वेळातच समुद्रात त्या व्यक्तीचे रक्त पसरलेले दिसत होते.