शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: अंकारा , मंगळवार, 20 डिसेंबर 2016 (11:04 IST)

तुर्कीत रशियाच्या राजदुताची हत्या

तुर्कीत रशियाचे राजदूत आंद्रेई कालरेव यांची राजधानी अंकारामध्ये एका बंदूक हलल्यात गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. अलेप्पोला विसरु नका असा घोषणा हत्या करणाऱ्या तरुणाने दिल्या आहेत. सीरियात बंडखोरांविरोधात रशियाने हवाई हल्ले सुरु केले आहेत. उच्चायुक्तांच्या हत्येनंतर रशिया आणि तुर्कीमधील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.
 
अंकारामधील रशियाचे उच्चायुक्त आंद्रे कार्ले हे सोमवारी एका प्रदर्शनात उपस्थित होते. या दरम्यान सूटबूटमध्ये आलेल्या एका तरुणाने कार्ले यांच्यावर गोळी झाडली. या गोळीबारात कार्ले गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयातही नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आंद्रे कार्ले यांचे भाषणादरम्यान हल्लेखोर तरुण त्यांच्याजवळच उभा होता. भाषण सुरु असतानाच त्याने स्वतःकडील बंदुक बाहेर काढली आणि कार्ले यांच्यावर गोळी झाडली. गोळीबारानंतर उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण होते. कार्यक्रमासाठी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यामुळे हल्ल्याचे दृश्य कॅमेऱ्यातही कैद झाले आहे. 
 
हल्ल्यानंतर हल्लेखोर ‘अलेप्पोला विसरु नका, सीरियाला विसरु नका, आम्ही अलेप्पोमध्ये मरत आहोत आणि तुम्ही इथे मराल’ असे जोरजोरात ओरडून सांगत होता. पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोराचा मृत्यू झाला. हल्लेखोर हा २२ वर्षीय तरुण असून तो तुर्की पोलीस दलातील अधिकारी असल्याची माहिती आता समोर येत आहे.  हल्लेखोराच्या गोळीबारात तीन जण जखमी झाले आहेत. मेव्हलट मर्ल एल्टीन्टास असे या हल्लेखोराचे नाव आहे. उच्चायुक्ताच्या हत्येचे पडसाद रशियातही उमटले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे या घटनेने रशिया आणि तुर्कीमधील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे.