गुरूवार, 19 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (10:47 IST)

बांगलादेशात पुन्हा हिंसक संघर्ष, हाणामारीत अनेक जखमी

बांगलादेशची राजधानी ढाका येथील सचिवालयाजवळ रविवारी रात्री 9 वाजल्यानंतर विद्यार्थी आणि अन्सार सदस्यांमध्ये हिंसक चकमक झाली. यावेळी दोन्ही बाजूचे अनेक जण जखमी झाले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करून दोन्ही बाजूंमध्ये शांतता प्रस्थापित केली
 
रिपोर्ट्सनुसार, ढाका युनिव्हर्सिटीच्या विविध वसतिगृहातील विद्यार्थी प्रथम राजू मेमोरिअल स्कल्प्चर येथे सचिवालयाकडे कूच करण्यासाठी जमले, त्यानंतर त्यांनी अन्सार सदस्यांचा सामना केला. अन्सार सदस्यांच्या एका गटाने अंतरिम सरकारमधील सल्लागार आणि विद्यार्थी चळवळीचे समन्वयक नाहिद इस्लाम, सचिवालयातील समन्वयक सरजिस आलम, हसनत अब्दुल्ला आणि इतरांना ओलिस घेतल्याच्या वृत्तानंतर हाणामारी झाली. 
Edited By - Priya Dixit