testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

बी स्मार्ट

- डॉ. लीला पाटील

bee smart
वेबदुनिया|
ND
नोकरीच्या इंटरव्ह्यूला जाताना कसं दिसावं? काय नेसावं? अँक्सेसरीज कुठल्या वापरायच्या? असो नाहीतर ब्रेकनंतर पुन्हा जॉब शोधणारी युवती असो, मनात असेच हजारो प्रश्न ! बी स्मार्ट - फस्र्ट इम्प्रेशनला महत्त्व आहेच; ते नाकारून चालणार नाहीच !!

जॉब शोधण्यासाठी, इंटरव्ह्यू देण्यासाठी, चौकशीसाठी गेल्यावर तुम्ही दिसता कशा? ही बाब एकमेव नसली तरी फार महत्त्वाची आहे. सुपर मॉडेल दिसावं असं नाहीच मुळी आणि नकोही तसं. कारण घेणारांची तशी अपेक्षा नसली, तरी नीटनेटकं आणि प्रसन्न दिसणं आवश्यक आहे. दिसणं म्हणजे नुसता मेकअप आणि पार्लर सेवेचा नको तितका वापर नव्हे. तर तरतरीत, आत्मविश्‍वासपूर्ण व महत्त्वाकांक्षेचा भाव असणे होय. हायपर पेक्षा ‘कूल’ आणि घबराहट पेक्षा संयमाची गरज आहे.
हल्लीच्या तरुणी राहातात छान आणि दिसतात स्मार्ट. सौंदर्याची व्याख्यासुद्धा बदललेली. ती जाणून स्वतला नेमकेपणानं खुलवणं घडतं. तरीही काय नेसावं? कसं दिसावं? कोणाचा सल्ला इष्ट? साधं कि नखरेल? ब्युटिफुल की सात्त्विक? अशासारखे प्रश्न गोंधळात टाकतात. संभ्रम निर्माण होतो अगदी अँक्सेसरीज घालताना नि पादत्राणे निवडताना. शिवाय ‘जॉबसाठी तर इंटरव्ह्यू आहे ना ! दाखवायला जात नाहीस मुलाकडच्या पसंतीसाठी. पोशाखावर अन् दिसण्यावर काय आहे?’ असे आई-बाबांकडून सुनावले जाते.
पण पेहराव, हलकासा मेकअप दिसणं बदलून टाकतो. ‘फस्र्ट इम्प्रेशन चांगलं होणंही महत्त्वाचं, गबाळग्रंथी, अव्यवस्थित कॅज्युअल असणं म्हणजे एन्ट्रीलाच ‘आऊट’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग मुलाखतीसाठी पेहराव कसा योग्य? तर आपण ज्या क्षेत्रात नोकरी मिळवू इच्छितो त्यावर ते अवलंबून आहे. टीव्ही कार्यक्रमातून दाखविला जाणारा पोशाख, केसाची स्टाईल, लिपस्टिक-नेलपेंट, कानातले लांबलचक व चकमकणारे हे सगळं तिकडेच शोभून दिसतं. रिअल लाईफ हा रियालिटी शो नसतो पडद्यावरचा.
तेव्हा जीन्स - टी शर्ट मुलाखतीला नको. नंतर नोकरीत रेग्युलर चालेल आय. टी. कंपन्यांमध्ये. आणि असा शॉर्ट लो कट पोशाख हा कॉलेज पिकनिकसाठी, इंटरव्ह्यूसाठी नकोच. फॅशन्सच्या अँडच्या क्षेत्रातील मुलाखतीसाठी काही उठावदार भडक चालेल. पण फायनान्स, मॅनेजमेंट अकौंटिंग, टिचिंग वगैरेसाठी अगदी एनजीओसह अन्य क्षेत्रांत हॅण्डलूमचा सलवार-कमीज, अथवा साडी योग्य ठरेल.एका इंटरव्ह्यूच्या वेळी घडलं असं की, सगळं झक्क मॅचिंग आणि साडी नेसून आलेली तरुणी. मुलाखत दालनात प्रवेश करून पुढे येताना साडी पायात घोटाळल्याने घोटाळा. तिनं सावरलं स्वतला. पण डॅम नर्व्हस होणं आणि डोळे भरून येऊनही अश्रू रोखण्यात यशस्वी झालेली. साडी नेसण्याची सवय नसण्यातून हा घोळ. पण सावरणं स्वतला झटकन आणि पटकन हसतमुखानं जणू काही घडलं नाही, असं दाखवत सिद्ध झाली मुलाखतीला. उत्तरंही दिली आत्मविश्‍वासानं. गडबडली नाही की गोंधळली नाही. खरं तर तिचं सावरणं, स्वतला सिद्ध करणं हेच मुळी ‘प्लस’. अर्थात जॉबला पात्र ठरली.
डौलदार, स्मार्ट काहीसं रिलॅक्स दिसणं घडावं असा पेहराव हवा. तशीच अँक्सेसरीज, केशभूषाही. फार भडक नको अगदी फेन्ट नको. शोभेसा रंग निवडावा. हॅण्डब्लॉक पिंट्र किंवा तथाकथित इंडो-वेस्टर्न लूक चांगला दिसतो. रूढीप्रिय ऑफिसात अशा ‘लूक’ला वाढ आहे आणि साडी नेसून चालणं जमत नसेल, तर त्या पोशाखाला सहसा आक्षेप नसतोच. पदर पिना लावून नीट सुरक्षितपणे जागी असावा. वेशभूषा व एकूणच बाह्य रूप जॉबशी सुसंगत असावं एवढंच !
मेकअपच्या बाबतीत डिसेन्सी हाच नियम. फक्त चेहर्‍यावर लक्ष केंद्रित करून हात, गळा, नखं, कोपरे, पंजे वगैरेकडे दुर्लक्ष करू नये. सगळं कसं टापटीप व व्यवस्थित असावं. कारण हल्लीच्या युगात क्षेत्र कोणतंही असो नोकरीचं, तिथं टापटीपपणा, नीटनेटकेपणा आणि फ्रेशनेस यास महत्त्व खूपच आणि त्यास मार्कस्ही. मुलाखत घेणारे अनुभवी. एका दृष्टिक्षेपात हे सगळं टिपून घेण्यात पारंगत असतात. ‘एक नूर आदमी दस नूर कपडा’ ही म्हण आजच्या आधुनिक युगातही पाळली जाणारी किंबहुना आताच्या जगात त्यास अधिकच महत्त्व आहे.
सागणं एवढंच की, मुलाखतीस जातेवेळी घरी शांतपणे तयार व्हावं. ‘सांग दर्पणा कशी मी दिसते’ असंही विचारावं. पादत्राणे घालून मागून साडी, ड्रेस वर गेलाय का? हेही पाहावं. खरंतर ब्रेसिअरचा हूक नीट लावावा आणि दोन्ही बाजूच्या पट्टय़ा डोकावणार नाहीत, याची काळजी घ्यावी. तरतरीतपणा, चुणचुणीतपणात साजेशी भर टाकणारी वेशभूषा नि कानातलं शोभेसं घालावं. सूत्र एकच ते म्हणजे डिसेन्सी, डिग्निटी आणि डिझर्व्हनेस दिसावं असं असावं. तोच ‘लूक’ आपलं ‘लक’ पॉझिटिव्ह होण्यास मदतगार ठरतो.


यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

खास पंजाबी ढाबा : माखनी डाळ (दाल माखनी)

national news
सर्वप्रथम मसूर, राजमा, चणाडाळ धुवून घ्यावी. डाळी, राजमा, आलं-लसूण पेस्ट, टोमॅटो, मीठ, लाल ...

लिंबूपाणी आहे आरोग्यासाठी संजीवनी

national news
झोपेतून उठल्यावर आपल्यापैकी अनेकांना चहा किंवा कॉफी लागतेच. बहुतेकदा आपल्या सकाळची ...

कॉन्टॅक्ट लेन्स लावत असाल तर मेकअप करताना घ्या काळजी

national news
अलीकडे आपल्या सौंदर्यात भार घालण्यासाठी अनेक महिला कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करतात. अशावेळी ...

Home Remedies : पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...

national news
सध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत ...

रिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे

national news
* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, ...