Last Modified शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 (16:40 IST)
आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात बंगळुरुचा 97 धावांनी निराशाजनक पराभव झाला. या पराभवानंतर बंगळुरुच्या कर्णधाराला म्हणजेच विराट कोहलीला 12 लाखांचा दंड भरावा लागणार आहे. विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबविरुद्ध गोलंदाजी करताना बंगळुरुला आवश्यक षटकांची गती राखता आली नाही. या कारणामुळे विराट कोहलीला बंगळुरुचा कर्णधार या नात्याने दंड ठोठावण्यात आला आहे. बोलिंग करताना ठराविक षटकांची गती कायम ठेवावी लागते. हीच गती कायम न राखल्याने विराटला हा दणका बसला आहे.