शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2020
Written By
Last Updated : बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (21:09 IST)

IPL 2020 सुरू होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्स, रॉयला चॅलेंजर्स बंगळुरूला मिळाले नवे प्रायोजक..

राजस्थान रॉयल्सने 19 सप्टेंबर पासून UAE मध्ये सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग(IPL) च्या आगामी टप्प्यासाठी टीव्ही-9 भारतवर्षाला त्याचा मुख्य भागीदार म्हणून नियुक्त केले आहे. राजस्थान रॉयल्सच्या जर्सी ब्रँडवर आता एक्सपो 2020 दुबईच्या ऐवजी या चॅनलचे नाव दिसून येणार आहे. दरम्यान, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयला चॅलेंजर्स बंगळुरूच्या आगामी टप्प्यासाठी अधिकृत जीवन बिमा भागीदार आणि परिधान भागीदार मॅक्स लाईफ इन्शुरन्स असतील.
 
या पूर्वी कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये पण टीव्ही न्यूज नेटवर्क ने त्रिनबागो नाइट रायडर्स शी करार केले होते. इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची सुरुवात पुढील महिन्यात होणार आहे. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत खेळली जाणार आहे. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे या स्पर्धेला भारताऐवजी UAE मध्ये आयोजित केले जात आहे. सर्व आठही फ्रॅन्चायझीचे खेळाडू आणि अधिकारी स्पर्धेच्या तयारीसाठी UAE मध्ये दाखल झाले आहेत.
 
चेन्नई सुपरकिंग आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यासह या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. दोन्हीही संघ या लीगमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहेत. जेथे रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सर्वात अधिक चारवेळा IPL विजेतेपद पटकावले आहेत, तर भारताचे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स यांनी तीन वेळा विजेतेपद जिंकून आपल्या नावी केले आहेत. मागीलवर्षी इंडियन प्रीमियर लीग(IPL) च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स यांनीच चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करून विजेतेपद पटकावले.