शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2021
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (23:22 IST)

IPL 2021: CSK ने विराट आर्मीला 6 गडी राखून पराभूत केले

चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा रोमहर्षक सामन्यात पराभव केला.
 
देवदत्त पडिकल (70) आणि कर्णधार विराट कोहली (53) यांच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) ने आयपीएल 2021 च्या 35 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ला 157 धावांचे लक्ष्य दिले. 
 
CSK कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकांत 6 बाद 156 धावा केल्या.
 
CSK साठी ड्वेन ब्राव्होने तीन, शार्दुल ठाकूरने दोन तर दीपक चहरने एक विकेट घेतली.
 
तत्पूर्वी, कर्णधार कोहली आणि पडिकलने आरसीबीला चांगली सुरुवात केली कारण दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी केली. 
 
ही भागीदारी ब्राव्होने कर्णधार कोहलीला बाद करत मोडली, ज्याने 41 चेंडूत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 53 धावा केल्या. यानंतर काही वेळातच नवीन फलंदाज म्हणून उतरलेल्या एबी डिव्हिलियर्स (12) ला शार्दुलने बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 
 
पडीकलही फार काळ टिकू शकला नाही आणि त्यानेही 50 चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 70 धावा केल्या. शार्दुलने पडीकलची विकेटही घेतली. यानंतर कोणताही फलंदाज उभा राहू शकला नाही, टीम डेव्हिड (1), ग्लेन मॅक्सवेल (11), हर्षल पटेल (3) आणि वनिंदू हसरंगा एका धावेवर नाबाद राहिले.