1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: शनिवार, 26 मार्च 2022 (12:56 IST)

IPL 2022: CSK आणि KKR यांच्यातील पहिला सामना आज

IPL 2022: First match between CSK and KKR todayIPL 2022: CSK आणि KKR  यांच्यातील पहिला सामना आज  IPL 2022 Marathi Cricket News  In Webdunia Marathi
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15व्या हंगामला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे. संघांची संख्या वाढवण्याबरोबरच या वेळी लीगमध्ये बरेच काही बदलत आहे. अशा स्थितीत यंदाची स्पर्धा अधिक रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. आयपीएल 2022 च्या उद्घाटन सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना गतवर्षीच्या उपविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सशी होणार आहे. यावेळी दोन्ही संघ नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरतील. केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरला आयपीएलमधील कर्णधारपदाचा चांगला अनुभव आहे, तर रवींद्र जडेजा येथे प्रथमच संघाची जबाबदारी सांभाळणार आहे.चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना आज म्हणजेच 26 मार्च रोजी होणार आहे.  पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता, तर पहिला चेंडू 7.30 वाजता टाकला जाईल.
 
CSK आणि KKR सामन्यांचे प्रसारण हक्क स्टार नेटवर्ककडे आहेत. त्यामुळे स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरही या सामन्याचे प्रसारण होणार आहे. स्टार स्पोर्ट्स चॅनलवर आपण वेगवेगळ्या भाषांमध्ये थेट सामने पाहू शकता. भारतातील हॉटस्टार अॅपवर CSK आणि KKR यांच्यातील IPL सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.