गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: बुधवार, 13 एप्रिल 2022 (23:34 IST)

PBKS vs MI : मुंबईचा सलग 5वा पराभव, पंजाबने 12 धावांनी सामना जिंकला

PBKS vs MI: Mumbai's 5th consecutive defeat
IPL च्या 15 व्या हंगामातील 23 वा सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 20 षटकांत 5 गडी गमावून 198 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला 20 षटकांत 9 गडी गमावून 186 धावाच करता आल्या. पंजाबने हा सामना 12 धावांनी जिंकला.  
 
मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली. पण रोहित 28आणि किशन लागोपाठच्या षटकांत तीन धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतले. मात्र, त्यानंतर ब्रेव्हिस आणि टिळक यांनी डाव सांभाळला. ब्रेव्हिस 49 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. टिळक वर्मा 36 धावा करून धावबाद झाला. पोलार्ड 10 धावा करून धावबाद झाला.
 
पंजाबकडून शिखर धवनने 70 धावा केल्या आहेत. पंजाबचे सलामीवीर शिखर धवन आणि मयंक अग्रवाल यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. मयंक आणि धवन यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी केली. बेअरस्टो 13 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. लिव्हिंगस्टोनने 3 चेंडूत 2 धावा केल्या आणि बुमराहच्या बोल्ड झाला. धवनने 50 चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांसह 70 आणि मयंकने 32 चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांसह 52 धावा केल्या, तर जितेशने 15 चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांसह 30 धावा केल्या. तर शाहरुख ने 6 चेंडूत दोन षटकारांसह 15 धावा केल्या. मुंबई इंडियन्सचा हा सलग 5 वा पराभव आहे.