शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 16 जुलै 2019 (09:08 IST)

'या' चार आयफोनची विक्री भारतात बंद

सर्वात महागडा स्मार्टफोन ब्रँड अशी ओळख असणाऱ्या अॅपल कंपनीने आपल्या चार खास स्मार्टफोनची विक्री बंद केली आहे. येत्या काही दिवसात iPhone SE, iPhone 6, iPhone 6Plus आणि iPhone 6sPlus हे चारही आयफोन भारतात बंद होणार आहे. हे चारही आयफोन अपलच्या सर्वात स्वस्त आणि सुरुवातीच्या किमतीतील आहेत. मात्र हे चारही स्मार्टफोन बंद होणार असल्याने भारतातील आयफोनच्या चाहत्यांना कमी किमतीतील आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न महाग होणार आहे.
 
आयफोनच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात iPhone SE, iPhone 6, iPhone 6Plus आणि iPhone 6sPlus या चारही आयफोन बनवणे बंद केलेत. त्यामुळे काही दिवसात भारतात हे चार आयफोन बंद होतील. त्या ऐवजी भारतात नवीन आयफोनचा iPhone 6s हा फोन येईल अशी माहिती आयफोन विक्री करणाऱ्या वितरकांना अपलच्या सेल्स टीमने दिली आहे. त्यामुळे आता या चार आयफोनऐवजी भारतात आता नवा iPhone 6s हा फोन येणार आहे.
 
iPhone 6s  या फोनची किंमत 29 हजार 500 रुपये आहे. पण यापूर्वी भारतातील iPhone SE ची सुरुवात किंमत 21, 000 किंवा 22,000 रुपये होती. त्यामुळे आता आयफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला 8 हजार रुपये अधिक खर्च करावा लागणार आहे.
 
अपलने हे चारही आयफोन बंद करण्याचा निर्णय 2018-19 मध्ये घेतला होता. एप्रिल मे महिन्यात भारतात अॅपलच्या सेलमुळे कंपनीला चांगला फायदा झाला होता. गेल्या एप्रिल मे महिन्यात कपंनीच्या नेट प्रॉफीटमध्ये 896 कोटींची वाढ झाली आहे.