मंगळवार, 14 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 16 सप्टेंबर 2019 (16:06 IST)

ब्रिक्सेलेंट डिजिटल लर्निंग’ स्टार्टअपची शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांन्ती

एक मिलियन डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक लाखो विद्यार्थ्यांचे मोफत शिक्षण सुरु
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी वेगवेगळ्या स्टार्टअप उद्योगांना प्रोत्साहित केले. अशाप्रकारे स्टार्टअपच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘ब्रिक्सेलेंट डिजिटल लर्निंग’ ने डिजिटल शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांन्ती घडविली आहे. उत्तर महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात स्टार्टअपमध्ये एक मिलियन डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक होत आहे. सदरची गुंतवणूक अमेरिका आणि हॉंगकॉंग येथील अँजेल इन्व्हेस्टर्स यांनी केलेली आहे. विशेष म्हणजे यामुळे विद्यार्थ्यांना मोफत स्वरूपात डिजिटल शिक्षण मिळत असून आतापर्यत हजारो विद्यार्थ्यांनी स्वअध्ययनाला सुरुवात केली आहे.
 
मुळचे नाशिककर असलेले मिलिंद महाजन हे आता अनिवासी भारतीय आहेत. त्याच्यासोबत अरविंद सोनवणे आणि वैशाली वाघ यांनी एकत्र येऊन ब्रिक्सेलेंट डिजिटल लर्निंगची सुरुवात केली. यामध्ये आधुनिक शिक्षणाची गरज ओळखून डिजिटल माध्यमातून काम सुरु केले. विदयार्थी, पालक आणि शाळा यांना विचारात घेऊन “Qeasily” या एसएससी आणि सीबीएससीच्या शालेय अभ्यासक्रमावर आधारित अँड्रॉइड अँप आणि वेबसाईटवर मोफत डिजिटल शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. सर्वाना मोफत डिजिटल शिक्षण या अंतर्गत सुरू केलेल्या उपक्रमाला जिल्हा, राज्य आणि देशातून हजारो विद्यार्थ्यांनी आणि शाळांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. सध्या दोनशेहून शाळा आणि 60 हजाराहून अधिक विद्यार्थी याचा रोज उपयोग करत आहेत. “Qeasily”च्या झपाट्याने होणारा विस्तार आणि वाढती लोकप्रियता पाहाता अमेरिका आणि हॉंगकॉंग येथील अँजेल  इन्व्हेस्टर्स यांनी उत्तर महाराष्ट्रातील डिजिटल शिक्षण क्षेत्रातील ब्रिक्सेलेंटमध्ये गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक एक मिलियन डॉलर इतकी आहे. राज्यात शिक्षण क्षेत्रात त्यातही उत्तर महाराष्ट्रात अशाप्रकारे आर्थिक गुंतवणूक मिळाल्याचे हे पहिलेच उदाहरण ठरले आहे. सदरच्या गुंतणुकीनंतर एक हजारहून अधिक शाळा आणि 10 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ब्रिक्सेलेंट डिजिटल लर्निंग वापरण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
 
'फ्री डिजिटल एज्युकेशन टू ऑल' हे ध्येय असल्याने याचा सर्वानाच फायदा होणार आहे. यामुळे शाळामध्ये डिजिटल शिक्षणावर होणाऱ्या खर्चाची पूर्णपणे बचत करण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. तसेच विद्यार्थी आणि पालक यांना सुद्धा डिजिटल लर्निंगसाठी वेगळा खर्च करावा लागणार नाही. यामुळे एकूणच विद्यार्थी, पालक आणि शाळा अशा सर्वानाच याचा थेट फायदा झाला आहे. सोबतच शिक्षणासाठी एकाच व्यासपीठावर उपलब्ध होत असल्यामुळे बिनचूकपणे शिकवता येणे अगदी सहज शक्य झाले आहे.
 
प्रतिक्रिया“ ब्रिक्सेलेंटला मिळालेली ही गुंतवणूक फारच उपयोगी ठरणार आहे, आमचा एकच उद्देश आहे की उत्तम असे शिक्षण विद्यार्थी वर्गाला मिळावे.  सोबतच त्याच्या शिक्षकांना देखील याचा लाभ झाला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मोफत डिजिटल शिक्षण उपलब्ध झाल्याने शाळांना याचा मोठा आधार वाटत असल्याचे” असे मत न्युयॉर्क येथे स्थायिक असलेले आणि ब्रिक्सेलेंटचे मुख्य संस्थापक श्री. मिलिंद महाजन यांनी व्यक्त केले आहे.
 
श्री. अरविंद सोनवणे, ब्रिक्सेलेंटचे सहसंस्थापक पुढे म्हणाले की, “सर्व विषयांसोबतच विद्यार्थ्यांना मातृभाषेत डिजिटल शिक्षण उपलब्ध झाल्याने ते समजायला सोपे आहे. नजीकच्या काळात आम्ही 10 लाखाहून अधिक विद्यार्थी आणि एक हजाराहून अधिक शाळापर्यत पोहोचणार आहोत. ही परकीय गुंतवणूक आम्ही झपाट्याने विस्तार करण्यासाठी वापरणार आहोत. सध्या माफक दरात उपलब्ध होणारे  इंटरनेट आणि समाजात स्मार्ट फोनचा वाढता वापर यामुळे जागरूकता निर्माण झाली आहे. याचा उपयोग करत असून आम्ही पालक वर्गाला डिजिटल शिक्षणाचा उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. वैशाली वाघ ब्रिक्सेलेंटचे सहसंस्थापिका यांनी सांगितले की, आम्हाला शहरी आणि ग्रामीण अशा सर्वच ठिकाणाहून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सध्या 10 १० जिल्ह्यामध्ये सुरु असलेले काम लवकरच देशभरात पोहोचवणार आहोत. सध्या ब्रिक्सेलेंटच्या माध्यमातून 300 हून अधिक लोकांनां प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजागर उपलब्ध झाला आहे. तसेच असे आवर्जून सांगावेसे वाटते की, ऑस्ट्रेलिया, दुबई आणि अमेरिका येथील अनिवासी भारतीय आपल्या पाल्याना भारतीय पद्धतीचे शिक्षण समजावे यासाठी उत्सुकतेने ब्रिक्सेलेंटचा वापर करत आहेत.