वाचली का बीएसएनएलची शानदार ऑफर
लॉकडाउन असल्याने घरीच बसावं लागत असलेल्या आपल्या ग्राहकांच्या मनोरंजनासाठी बीएसएनएलने एक शानदार ऑफर आणली आहे. बीएसएनएल आपल्या ग्राहकांना अॅमेझॉन प्राईम मेंबरशीप कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता म्हणजे अगदी मोफत देत आहे. ९९९ रुपयांची किंमत असलेली अॅमेझॉन प्राईम मेंबरशीप बीएसएनएलने फ्री मध्ये देणे सुरू केले आहे. मात्र, ही ऑफर केवळ कंपनीच्या पोस्टपेड आणि ब्रॉडबँड ग्राहकांसाठीच आहे. प्रीपेड ग्राहकांना याचा लाभ मिळणार नाही.
३९९ रुपयांपेक्षा अधिकचा पोस्टपेड प्लॅन असणाऱ्या सर्व ग्राहकांना या ऑफरचा लाभ मिळेल. यामध्ये ४०१ रुपये, ४९९ रुपये, ५२५ रुपये, ७२५ रुपये, ७९८ रुपये, ७९९ रुपये, ११२५ रुपये आणि १५२५ रुपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे. याशिवाय ७४५ रुपयांपेक्षा अधिकचा ब्रॉडबँड प्लॅन असणाऱ्यांनाही या ऑफरचा लाभ मिळेल.