मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

फेसबुकच्या पाच कोटी यूजर्सचे अकाउंट हॅक, काय आपल्यालाही बदलावं लागेल पासवर्ड

फेसबुकने आपल्या यूजर्सच्या सुरक्षेत चूक असलेल्या एका मोठ्या प्रकरणाची माहिती देत सांगितले की अज्ञात लोकांनी फेसबुकच्या पाच कोटी यूजर्सचे अकाउंट हॅक केले होते.
 
फेसबुकने म्हटले की हल्लेखोरांनी यूजर्स लॉग इन राहावे म्हणून कंपनी द्वारे वापरण्यात येणार्‍या डिजीटल की चोरून त्या अकाउंट्सवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता मिळवली होती. फेसबुकने प्रभावित पाच कोटी यूजर्सला लॉगआउट केले आणि चार कोटी इतर यूजर्सला देखील लॉगआउट केले ज्यांचे अकाउंट हॅक झाल्याची शंका होती.
 
त्यांनी म्हटले की यूजर्सला आपला फेसबुक पासवर्ड बदलण्याची गरज नाही. सोशल नेटवर्किंग साइटने म्हटले की या हल्ल्यामागील कोण आणि कुठले आहे हे माहीत पडलेले नाही. फेसबुक सीईओ मार्क जुकरबर्ग यांनी म्हटले की हॅकर्सकडे खासगी संदेश अर्थातच त्या अकाउंट्सवर पोस्ट बघण्याची क्षमता होती परंतू यामागील कारण स्पष्ट झालेले नाही.
 
जुकरबर्ग यांनी म्हटले की कोणत्याही अकाउंटचा दुरुपयोग केल्या गेल्याचे अजून तरी स्पष्ट झालेले नाही.