1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 16 मे 2018 (16:57 IST)

फेसबुकने सुमारे तीन कोटी पोस्ट केल्या डिलीट

फेसबुकने  2018च्या पहिल्या तीन महिन्यातील जवळपास तीन कोटी पोस्ट डिलीट केल्या आहेत. यामध्ये आक्षेपार्ह मजकूर, फोटो व व्हि़डीओंचा समावेश आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करत फेसबुकने जवळपास 3 कोटी 40 लाख पोस्टवर कारवाई केली आहे. 2017च्या शेवटच्या तीन महिन्याच्या तुलनेत पोस्टचा आकडा तीनपट जास्त असल्याचं फेसबुकने सांगितल आहे. 

सोबतच फेसबुकने फेसबुकवरील 200 अॅप्सही हटवले आहेत.  या अॅप्सच्या माध्यमातून युजर्सची खासगी माहिती वापरल्याच्या संशयातून तपासणीसाठी हटविले आहेत. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या 19लाख पोस्ट फेसबुकने डिलीट केल्या. कुठलाही अलर्ट न देता ही कारवाई करण्यात आली आहे. लोकामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या 25 लाख पोस्ट हटविल्या आहेत.