मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 10 जून 2019 (14:37 IST)

फेसबुकने Huawei द्वारे अॅप इंस्टॉल करणे प्रतिबंधित केले

फेसबुकने हुवावेद्वारे विकले जाणार्‍या स्मार्टफोनमध्ये आधीपासूनच त्याचे अॅप इंस्टॉल करणे प्रतिबंधित केले आहे. अमेरिकेच्या प्रतिबंधनांकडे पाहून त्याने हा निर्णय घेतला आहे.
 
फेसबुकने सांगितले की त्याने हुवावेला त्याच्या फोनमध्ये टाकण्यासाठी सॉफ्टवेअर उपलब्ध करवण्यावर बंदी घातली आहे. अमेरिकेच्या प्रतिबंधनांच्या अलीकडील आढाव्यानंतर त्यांनी हे केले. सध्या ज्या लोकांकडे आधीपासूनच हुवावेचा फोन आहे आणि त्यात फेसबुक इंस्टॉल्ड आहे, ते त्याचा वापर करण्यात सक्षम असतील.
 
तरी सध्या हे स्पष्ट झालेले नाही की हुवावेचा नवीन फोन खरेदी करणारे ग्राहक स्वतः हुन फेसबुक इंस्टॉल करण्यात सक्षम असतील वा नाही.