शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

फ्लिपकार्टची नो रिफंड पॉलिसी मागे

ई- कॉमर्समध्ये आघाडीची कंपनी असलेल्या फ्लिपकार्टनं गेल्या काही दिवसांपूर्वी नो रिफंड पॉलिसी बाजारात आणली होती. मात्र ग्राहकांची संख्या घटण्याच्या भीतीपायी फ्लिपकार्टला ती पॉलिसी मागे घ्यावी लागली आहे.

ऑनलाइन बाजारातून ग्राहक प्लिपकार्टपासून दूर जाण्याच्या चिंतेमुळे फ्लिपकार्टनं ही पॉलिसी नव्या पद्धतीनं पुन्हा ग्राहकांसाठी सेवेत आणली आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने शॉपिंग करणा-या ग्राहकांना वस्तू परत केल्यास आता रिफंडच्या स्वरूपात पैसे मिळणार आहे.

बुक्स, होम डेकोर आणि लाइफस्टाइल, फॅशन प्रॉडक्शन, फिटनेस इक्विपमेंट, म्युझिक इन्स्ट्रुमेंट्स आणि इतर वस्तूंवर फ्लिपकार्टचे ग्राहक आता रिफंड मिळवू शकतात.