शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 21 फेब्रुवारी 2019 (11:13 IST)

Jio वापरकर्त्यांसाठी चांगली बातमी

Good news for Jio users
अलीकडे स्मार्ट फीचर फोन मार्केट जोरदार वाढला आहे. स्मार्टफोनच्या या काळात देखील मोबाइल वापरकर्ते स्मार्ट फीचर फोनकडे वळत आहे आणि त्यांना स्वीकारत आहे. आता एक संशोधनात उघड झाला आहे की Reliance Jio ने या मार्केटमध्ये सर्वात वेगवान गतीने 5 कोटी फीचर फोन विकले आहे. कंपनीने 2 वर्षाच्या आतच स्मार्ट फीचर फोन विकून दिले. 
 
Jio Phone मध्ये येणार्‍या यूट्यूब, व्हाट्सएप फेसबुकसारख्या फीचर्समुळे फीचर फोन मार्केटमध्ये जिओ फोनने 38 टक्के कब्जा करून घेतला आहे. अहवालानुसार या श्रेणीमध्ये रिलायन्स जिओ फोन सर्वात पुढे आहे. 
 
कंपनीने 2017 मध्ये जिओ फोन लॉचं केले होते, ज्यांची किंमत 1500 रुपये होती. त्यानंतर गेल्या वर्षी कंपनीने Jio Phone 2 लॉचं केला. हे QWERTY कीपॅडसह सादर केले गेले आणि किंमत वाढवून 2,999 रुपये करण्यात आली. गेल्या वर्षी जुलैपर्यंत रिलायन्सने 2.5 कोटी फोन विकले होते. अहवालानुसार, वर्ष 2018 मध्ये स्मार्ट फीचर फोनच्या मागणीत वर्ष-दर-वर्षी 252% वाढ झाली आहे. असे अनुमान आहे की 2021 पर्यंत स्मार्ट फीचर फोन जागतिक फीचर फोनच्या अर्ध्याहून अधिक भागाला ओलांडून जाईल. तसेच पुढील तीन वर्षांत 370 दशलक्ष स्मार्टफोन फोन जगभरात विकले जातील.