मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019 (13:05 IST)

गूगलने ब्लॉक केलं हे अ‍ॅप, हॅक होत होती माहिती

सर्च इंजिन कंपनी गूगलने चीनच्या स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीचं एक अॅप ब्लॉक केलं आहे. टेक कंपनी गूगलने शाओमीचं Quick apps ला प्रोटेक्ट पॉलिसी अंतर्गत ब्लॉक केलं आहे. ही माहिती शाओमी यूजर्सने शेअर केली आहे. हे अॅप यूजर्सची कॉल, फोटो, व्हिडिओ आणि मेसेज सारखी खासगी माहिती हॅक करत होतं. 
 
गूगलने हे अॅप अपडेट झाल्यानंतर 14 नोव्हेंबरपासून ब्लॉक केलं आहे. परंतू प्ले स्टोअरहून हे अॅप हटवण्याबद्दल अधिकृत माहिती दिलेले नाही. इकडे शाओमीने देखील या प्रकरणात अधिकृत वक्तव्य केलेले नाही.
 
रिपोर्ट्स प्रमाणे शाओमीच्या क्विक अॅपने एप्रिलमध्ये अनेक यूजर्सच्या परवानगी विना फोनमध्ये अनेक थर्ड पार्टी अॅप्स डाउनलोड केले होते. सोबतच अॅपने यूजर्सच्या फोनची आयएमआय, आयएमएसआय, सिम नंबर, ऑडिओ, व्हिडिओ, कॉल्स आणि संदेश देखील ट्रॅक केले होते. या व्यतिरिक्त अॅप एनालेटिकल डॅशबोर्डद्वारे यूजर्सची सर्व माहिती आपल्या सर्व्हरवर पोहचवत होता. तसेच अॅपने स्क्रीन आणि ब्राउझर लॉक करण्याचा प्रयत्न केला होता.
 
उल्लेखनीय आहे की गूगलने ऑक्टोबरमध्ये आपल्या प्लेटफॉर्महून Feel Camera HD, Filter Photo Frame, Lens Flares, Magic Effect, QR Code Scanner, Super Mark, Photo Effect Pro, Art Filter, Lie Detector prank आणि New Hair Fashion सारखे अॅप्स हटवले होते.
 
तसेच क्विक अॅप सध्या प्ले स्टोअरवर उपलब्ध नसल्याचे देखील सांगितले जात आहे.