मंगळवार, 2 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 28 मार्च 2022 (16:19 IST)

कोरोना रिंग टोन या प्रकारे करा Deactivate

how to Deactivate the corona ring tone
कोरोनाच्या काळात देशातील सर्व नागरिकांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीच्या उपायांची माहिती व्हावी यासाठी सरकारकडून सर्व मोबाईल फोनवर रिंग टोन सुरू करण्यात आली होती. जी आता बंद होणार आहे.
 
1: कोणतेही Android वापरकर्ते ज्यांना कोरोना बचाव रिंगटोन बंद करायची आहे त्यांनी सर्वप्रथम तुम्हाला ज्या नंबरवर कॉल करायचा आहे तो नंबर डायल करा.
 
2: मग कोरोनाची रिंग टोन सुरू होताच, तुम्हाला मोबाईलमध्ये 1 नंबर दाबावा लागेल.
 
3: तुम्ही 1 नंबर दाबताच, कोरोना संबंधित रिंग टोन सामान्य रिंग टोनने बदलला जाईल.
 
iOS वापरकर्त्यांनी 
रिंग टोन कशा प्रकारे बंद करावी- Apple iOS वापरकर्त्यांना वरील प्रक्रिया देखील फॉलो करावी लागेल परंतु कॉल केल्यानंतर, मोबाईलमधील 1 नंबरऐवजी, हॅश (#) दाबा. यानंतर तुमचा कोरोना बचाव रिंगटोन बंद होईल.
 
तक्रारींनंतर घेतला निर्णय : दूरसंचार विभागाला बऱ्याच दिवसांपासून या रिंग टोनबाबत तक्रारी येत होत्या, ज्यामुळे कोरोनाची जाणीव होते, त्यानंतर दूरसंचार विभागाने आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून ग्राहकांना ज्या तक्रारींचा सामना करावा लागत होता. समस्या उद्धृत केल्या होत्या. ही रिंगटोन कधी थांबणार असा प्रश्न लोक विचारत आहेत, असे पत्रात म्हटले आहे. माहितीच्या अधिकाराखालीही रिंगटोन बंद करण्याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 
पुढे असेही म्हटले आहे की आता देशात कोरोनाचा वेग पूर्वीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, अशा परिस्थितीत आपण कोरोनाशी संबंधित रिंगटोन थांबवायला हवे, ज्यावर आरोग्य मंत्रालयाने त्याला मान्यता दिली आहे. लांबलचक रिंग टोनमुळे नाराज झालेल्या ग्राहकांनी दूरसंचार विभागाकडे तक्रार केली होती की, या रिंग टोनमुळे आपत्कालीन परिस्थितीत संपर्क होण्यास विलंब होतो, त्यामुळे ही रिंगटोन काढून टाकण्यात यावी.