बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 30 जानेवारी 2019 (09:30 IST)

आयफोनच्या फेसटाईम अॅपमध्ये आला बग

आयफोनच्या फेसटाईम अॅपमध्ये बग आढळल्याने, आयफोन युजर्समध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. समोरील व्यक्तीच्या परवानगीविना फेसटाईमच्या माध्यमातून तिचा आवाज ऐकायला येत आहेत. अॅपलकडून फेसटाईममधील बग फिक्स्ड करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. 
 
तुमच्या आयफोनमध्ये इनबिल्ट असलेल्या फेसटाईम अॅपवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला काँटॅक्ट्सची यादी दिसते. त्यातून तुम्हाला ज्यांच्याशी ऑडिओ किंवा व्हिडीओ कॉलिंग करायचं आहे, त्यांच्या काँटॅक्टवर क्लिक करुन, कॉलिंग करु शकता. समोरील व्यक्तीने कॉल रिसिव्ह केल्यानंतर, तुम्ही व्हिडीओ किंवा ऑडिओ कॉलिंग सुरु करु शकता. मात्र, यावेळी तुम्ही आणखी एकजणाला कॉलिंगमध्ये जोडू शकता. म्हणजे, कॉन्फरन्सवर घेऊ शकता. तशी आयफोनने फेसटाईममध्ये सुविधा दिली आहे. जास्तीत जास्त तिघांशी एकत्र फेसटाईम कॉलिंग करता येते. मात्र या बगमुळे तिसऱ्या व्यक्तीला फेसटाईमवर जोडण्यासाठी कॉल केल्यानंतर, समजा तिसऱ्या व्यक्तीने कॉल रिसिव्ह जरी केला नाही, तरी त्या व्यक्तीच्या आयफोनशेजारील आवाज फेसटाईमवर आधीच ग्रुप कॉलिंग करत असणाऱ्यांना येईल.