शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

जिओची सिम असेल तर माहीत करून घ्या बिल येईल की नाही

जर आपल्याकडे जिओची सिम आहे तर आपल्यासाठी कामाची बातमी आहे. आपल्याला हे जाणून घेणे आवश्यक आहे की आपली जिओ सिम पोस्टपेड आहे की प्रीपेड. कसे जाणून घ्याल:
सर्वात आधी आपण आपल्याला फोनमध्ये जिओ अॅप उघडा. यानंतर My jio  चे ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा. हे क्लिक केल्यावर जो पेज ओपन होईल त्यावर Welcome to your digital life  लिहिलेले असेल, याच पेजवर सर्वात खाली लिहिले असेल Skip Sign In, यावर क्लिक केल्यावर नवीन पेज उघडेल.
 
या नवीन पेजवर सर्वात वरती My Jio  लिहिले असेल. या पेजच्या डाव्या बाजूला आपल्याला Balance लिहिलेलं दिसेल, तर याचा अर्थ आपले जिओ कनेक्शन प्रीपॅड आहे. पण Balance याऐवजी Unpaid bill  लिहिलेलं असेल तर याचा अर्थ आपण वापरत असलेली सिम पोस्टपेड आहे.
 
रिलायन्स जिओद्वारे फ्री सेवा लिमिट संपल्यावर, पोस्टपेड जिओ यूजर्सला बिल येणे सुरू होतील.