रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

जिओकडून स्वस्त दरात JioFi 4G LTE हॉटस्पॉट डिव्हाईस लॉन्च

रिलायन्स जिओने स्वस्त दरात  अजून एक नवे प्रॉडक्ट स्वस्त दरात युजर्ससाठी उपलब्ध केले आहे.आता कंपनी भारतीय बाजारात JioFi लाईनअपचा विस्तार करणार आहे. याच्या अंतर्गत कंपनीने JioFi 4G LTE हॉटस्पॉट डिव्हाईस लॉन्च केले आहे. याची किंमत ९९९ रुपये आहे. जिओच्या या नव्या मॉडलला JioFi JMR815 असे नाव देण्यात आले आहे. 
 
कंपनी या प्रॉडक्टची वर्षभराची व्हॉरंटीने देत आहे. याचा डाऊनलोड स्पीड 150Mbps आणि अपलोड स्पीड 50Mbps आहे. इच्छुक फ्लिपकार्डवर याची खरेदी करु शकतात. जिओने आपल्या या डिव्हाईसला डिजाईन इन इंडिया अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. नवीन JioFi मॉडल नवीन गोलाकार आकारात आहे. पूर्वी याचा आकार अंडाकृती होता. यात पॉवर ऑन/ऑफ आणि WPS वायफाय प्रोटेक्टेड सेटअप सारखे बटन्स दिले आहेत. यात बॅटरी, 4G आणि Wi-Fi सिग्नलसाठी नोटिफिकेशन लाईट्सही आहेत.
 
यात एकावेळी ३२ युजर्स कनेक्ट होऊ शकतात. यात ३१ वाय-फायच्या माध्यमातून आणि १ युएसबीच्या माध्यमातून कनेक्ट होऊ शकतात. कनेक्ट झाल्यानंतर स्मार्टफोन्सवर Jio 4G व्हॉईस अॅपच्या माध्यमातून HD व्हाईस आणि व्हिडिओ कॉल्स करु शकाल. याशिवाय यात  ALT3800 प्रोसेसर देण्यात आला आहे आणि हे FDD-Band 3, Band 5 आणि TDD-Band 40 ला सपोर्ट करतात. त्याचबरोबर यात JioFi कार्ड स्लॉटही देण्यात आला आहे. याचा स्टोरेज 64GB पर्यंत वाढवता येईल.