शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 13 जुलै 2017 (09:12 IST)

आता फ्लिपकार्टचा मेगा सेल

सोशल मीडियातील ई-कॉमर्स कंपन्या भारतातील ऑनलाइन ग्राहकांसाठी वेगवेगळ्या ऑफर घेऊन येत आहे. दोन दिवसांपूर्वी अॅमेझॉन कंपनीने ग्राहकांसाठी एका सेलचे आयोजन केले होते. या सेलला अॅमेझॉन प्राइम डे असे या नाव देण्यात आले होते. तसेच, हा सेल 30 तासांच्या कालावधीसाठी ठेवण्यात आला होता. या सेलला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता असाच सेल अॅमेझॉनची प्रतिस्पर्धी कंपनी फ्लिपकार्टने सुद्धा सुरु केला आहे. फ्लिपकार्टने मेगा सेल या नावाने या सेलचे आयोजन केले आहे. 
 
फ्लिपकार्टने या मेगा सेलचे आयोजन बुधवारपासून सुरु केले असून यामध्ये जवळजवळ 80 टक्क्यांपर्यंत वस्तूंच्या खरेदीवर सवलत देण्यात आली आहे. अॅमेझॉनच्या प्राइम डे सेलनुसार फ्लिपकार्टने सुद्धा विशेष वस्तू म्हणजेच नव-नवीन मोबाईलटे लॉन्चिंग करणार आहे. तसेच, एचडीएफसीच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे वस्तूंची खरेदी केल्यास 10 टक्के सूट मिळणार आहे. याचबरोबर, ग्राहक फ्लिपकार्टच्या यूपीआय आधारित पेमेंट अॅप फोनपे वापरत असतील, तर ते 15 टक्के कॅशबॅक सुद्धा मिळवू शकतात. विशेष म्हणजे फ्लिपकार्टमधील टॉप ऑफर्समध्ये साड्या, फुटवेअर, बॅग यासारख्या वस्तूंच्या खरेदीवर 70 टक्के सवतल देण्यात आली आहे.