मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

व्हाट्सअॅपवर ग्रुपमधील सदस्याला पर्सनल मेसेज पाठवणे शक्य

whatsapp feature
व्हाट्सअॅप युजर्ससाठी एक नवीन अपडेट आणत आहे. या अपडेटमुळे ग्रुपमधील सदस्याला पर्सनल मेसेज पाठवणे शक्य होणार आहे. त्यासाठी त्या सदस्याला वेगळा पर्सनल मेसेज पाठवण्याची गरज नाही. ग्रुपमध्येच तुम्ही सदस्याला पर्सनल मेसेज पाठवू शकता.
 
व्हाट्सअॅपच्या नवीन बीटा व्हर्जनमध्ये आलेल्या नवीन बदलामुळे ग्रुपचा सदस्य त्या पर्सनल मेसेजला उत्तरही देऊ शकेल. पूर्वी तुम्ही केलेला मेसेज ग्रुपमधील सर्व सदस्य वाचू शकत होते. त्यामुळे पर्सनल मेसेज करण्यासाठी ग्रुप बाहेर पडून पर्सनल चॅटवर जावून तुम्हाला मेसेज करावा लागत होता. या नवीन अपडेटमुळे तुमचा हा त्रास वाचणार आहे. त्याचबरोबर व्हाट्सअॅप आता लवकरच बिझनेस ग्रुपसाठी विशेष अॅप बनवणार आहे. यात ग्रुप कॉलिंगची सुविधाही मिळेल.