शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 17 ऑक्टोबर 2018 (17:08 IST)

आता ट्रेस करता येणार लोकेशन ते पण जीपीएसविना

शास्त्रज्ञांनी एक अशी अ‍ॅल्गोरिदम टेक्निक (गणितांचे प्रश्र्न सोडवण्याची एक नियम प्रणाली) विकसित केली ज्यामुळे जेथे जीपीएस उपलब्ध नाही अशा ठिकाणी माणूस किंवा रोबोटला ट्रॅक करता येणार आहे. त्यामुळे आता जीपीएस नसतानाही लोकेशन ट्रेस करता येणार आहे. या प्रणालीचा शोध अमेरिकन सैन्य शोध प्रयोगशाळाच्या (एआरएल) शास्त्रज्ञांनी लावला असून एका भारतीय शास्त्रज्ञाचाही या टीममध्ये समावेश आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही प्रणाली अतिशय उपयोगी आहे. सैन्य, माणूस आणि रोबोट या तिघांना याच्या मदतीने मिळून काम करणे सोयीचे होणार आहे. एआरएलच्या एका शास्त्रज्ञाने सांगितले, की जीपीएसची अनेक उपकरणे कोणत्याही प्रकारच्या संकटांना तोंड देताना अतिशय महत्त्वाची ठरतात. उदाहरणार्थ जीपीएसच्या मदतीने कारने तुम्ही नियोजित स्थळ गाठू शकता. पण या प्रणाली सैन्यासाठी तेवढ्या उपयुक्त नाहीत. कारण यामध्ये एक मर्यादा आहे. जीपीएससाठी आवश्यक असलेले उपकरण जसे सॅटेलाईट जर नष्ट झाले, तर आम्हाला ट्रॅक करताना अडचणींचा सामना करावा लागेल. कधी-कधी बिल्डिंगच्या आतमध्ये जीपीएसचे सिग्नल मिळण्यास अडचण येते. अशावेळी ही अ‍ॅल्गोरिदमची प्रणाली आम्हाला लोकेशन ट्रेस करण्यास बरीच फायदेशीर ठरणार आहे, असे त्यांनी सांगितले.