1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: सोमवार, 8 जून 2020 (21:52 IST)

गुगल रिपोर्ट, सर्वाधिक हिंदी भाषेतील व्हिडिओ पाहिले जातात

सरासरी प्रत्येकी तीन भारतीयांपैकी  एक भारतीय दररोज एका तासापेक्षा जास्त ऑनलाईन व्हिडिओ  पाहतो, अशी माहिती गुगलच्या रिपोर्टमधून समोर आली आहे. 
 
गुगलच्या रिपोर्टनुसार, ऑनलाईन व्हिडिओ पाहताना सर्वाधिक हिंदी भाषेतील व्हिडिओ पाहिले जातात. 54 टक्क्यांसह हिंदी भाषा ऑनलाईन व्हिडिओसाठी सर्वात वरच्या स्थानावर आहे. त्यानंतर इंग्रजी भाषेतील व्हिडिओ 16 टक्के लोकांकडून पाहिले जातात. तेलुगु 7 टक्के, कन्नड 6 टक्के, तमिळ 5 टक्के तर बांग्ला भाषेतील ऑनलाईन व्हिडिओ 3 टक्के भारतीयांकडून पाहिले जातात.रिपोर्टनुसार, 
 
यावर्षी भारतातील विविध प्रदेश, लोकसंख्या आणि सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीचे ऑनलाईन व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या वाढून 50 कोटी होण्याचा अंदाज आहे. गुगलने रिपोर्टद्वारे सांगितलं की, भारतात ऑनलाईन व्हिडिओ पाहणारे सुमारे 37 टक्के लोक ग्रामीण भागातील आहेत.गुगलचा हा, 'अंडरस्टँडिंग इंडियाज ऑनलाईन व्हिडिओ व्ह्यूअर' रिपोर्ट 6500 हून अधिक लोकांमधील सर्वेक्षणावर आधारित आहे. त्यापैकी जवळपास 73 टक्के लोक 15 ते 34 वयोगटातील होते.रिपोर्टनुसार असं आढळलं की, ऑनलाइन व्हिडिओ पाहण्याचा दररोजचा सरासरी वेळ 67 मिनिटं असतो. त्याशिवाय, नवीन इंटरनेट वापरकर्तेही दररोज सरासरी 56 मिनिटं ऑनलाईन व्हिडिओ पाहत आहेत, असं रिपोर्टमधून सांगण्यात आलं आहे