बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मार्च 2017 (22:12 IST)

पर्यटन स्थळांच्या माहितीसाठी टूरीझम मोबाईल ॲप

राज्यातील विविध पर्यटन स्थळांची माहिती एकाच क्लिकवर उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाकडून टूरीझम मोबाईल ॲप ची  सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे राज्यातील पर्यटन स्थळांची माहिती आता क्लिकवर उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. एम.टी.डी.सी.मोबाईल ॲपचे अनावरण रावल यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. 
 
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मोबाईल ॲपमध्ये पर्यटकांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना सबंधीत पर्यटन स्थळाजवळील हॉटेल्स, रिसॉर्ट, हॉलीडे पॅकेजची माहिती, निसर्गरम्य स्थळे, महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांची माहिती, ई गाईडची सुविधा, तसेच नकाशा पाहून पर्यटनाच्या दृष्टीने नियोजन करता येणे सोपे होणार आहे.