रविवार, 19 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जुलै 2018 (08:37 IST)

सावधान : आता व्हॉट्सॅप ग्रुपमध्ये राहणार पोलिस

police in whatsapp group
महाराष्ट्रातल्या सव्वादोन लाख आणि मुंबईतल्या 50 हजार पोलिसांना जास्तीतजास्त व्हॉट्सॅप, फेसबुक आणि ट्विटर ग्रुप्समध्ये सामील होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे समाजात पसरत असलेली तेढ. छोट्या कारणांनी होणारे खून, अफवा आणि इतर गोष्टीवर आळा घातला जाणार आहे. इतकी समाज जागृती करून सुद्धा कोणताही फरक पडत नाही त्यामुळे हे पाऊल सरकारने उचलले आहे. राज्यात एक अफवा मुळे जीवघेण्या 11 घटना.घडल्या आणि  7 जणांची हत्या झाली तर  16 जण जखमी झाले आहेत. कोणतीही शहानिशा न करता मेसेज एका सेकंदात फॉरवर्ड होतो. पण त्याचे परिणाम काय होतील याचा कुणीही विचार करत नाही. म्हणूनच आता महाराष्ट्र पोलिसांनी ही नामी युक्ती काढली आहे. राज्यातील जवळपास सव्वादोन लाख आणि मुंबईतल्या 50 हजार पोलिसांना अधिकात अधिक अश्या सर्व व्हॉट्सॅप, फेसबुक आणि ट्विटर ग्रुप्समध्ये सामील होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
जगभरात व्हॉट्सॅप यूजर्सची संख्या 150 कोटींच्या घरात आहे. त्यातले तब्बल 20 कोटी ग्राहक हे भारतातले आहेत. आकडेवारीनुसार जगभरातले यूजर्स रोज 6 हजार कोटी मेसेज पाठवतात. त्यात भारत हा सर्वात आघाडीवर आहे. त्यामुळे समाज आणि पोलीसांनवर मोठी जबाबदारी असणार आहे. तुम्ही ही बातमी वाचत असला तो पर्यंत तुमच्या ग्रुपमध्ये शहरातील पोलीस मामा आधीच शामिल झाले असतील त्यामुळे सावधानता बाळगा, अफवा पसरवू नका. समाजघातक गोष्टी पसरवू नका.