गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 21 जुलै 2021 (13:04 IST)

लोकप्रिय अ‍ॅप टीक-टॉक वापसीची शक्यता

वर्षभरापूर्वी भारताने काही चिनी अ‍ॅप बॅन केले होते त्यामध्ये पबजी आणि टिकटॉक हे सर्वाधिक लोकप्रिय झाले होते.सध्या पबजी हे अ‍ॅप पुन्हा परतले आहे.आता याचे स्वरूप बदलण्यात आले आहे.आता भारतात टिकटॉक देखील नव्या रूपात पुन्हा वापसी करू शकतो ही माहिती मिळत आहे.या साठी टिकटॉकच्या कंपनीने नवीन नावाच्या नोंदणीसाठी अर्ज केला आहे.
 
कंपनी ने याचे नवीन डिझाईन,ट्रेडमार्कसाठी महानियंत्रकसह शॉर्ट-फिल्म व्हिडीओ अ‍ॅपसाठी ट्रेडमार्क दाखल केला आहे.याची अधिकृत माहिती अद्याप दिली गेली नाही.भारतात टिकटॉकचे तब्बल 20 कोटी युजर्स होते.या अ‍ॅप मुळे बरेच जण स्टार बनले होते.हे बंद झाल्याचा फायदा इतर अ‍ॅपने घेतला.
 
मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार,भारतात टिकटॉक नव्या आयटी धोरणानुसार काम करणार आहे .टिकटॉक कंपनी भारतात परत येण्यासाठी केंद्रसरकारशी चर्चा करत असल्याचे वृत्त मिळाले आहे.टिकटॉक बंद झाल्यावर त्याचे तब्बल 20 कोटी युजर्स वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म कडे वळले.त्यामुळे टिकटॉक चात्यांसाठी ही नक्कीच आंनदाची बातमी ठरणार आहे.