रविवार, 14 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Updated : शुक्रवार, 19 जुलै 2019 (09:37 IST)

आता सोशल मीडियावर म्हणजे #sareeTwitter किंवा #SareeSwag

priyanka gandhi
सोशल मिडिया साईट असलेल्ट्विया टरवर एक हॅशटॅग जबरदस्त ट्रेण्डिंग सुरु झाला आहे, म्हणजे #sareeTwitter किंवा #SareeSwag म्हणजे थोडक्यात साडी नेसलेले स्वतःचे फोटो अपलोड करणं होती. यामध्साये आठवड्याभरापूर्वी हा ट्रेण्ड सुरू झाला. त्यानंतर सेलिब्रिटी आणि सामान्य नागरिकांच्याही साडी नेसलेल्या फोटोंचा अक्षरशः पाऊस पडला आहे. न्यूयॉर्कमधल्या एका मासिकात आलेल्या साडीवरच्या एका लेखामुळे. त्या लेखामध्ये साडीबद्दल फार काही चांगलं लिहिलं नव्हतं. मग काय. साडी म्हणजे काय. त्यात भारतीय स्त्री कशी खुलून दिसते, हे भारतीय महिलांनी ठासून सांगायला सुरुवात केली. त्यात राजकारण क्षेत्रातल्या महिला आघाडीवर आहेत.
 
नगमा, प्रियंका चतुर्वेदी, नुपूर शर्मा यांनी त्यांचे साडीतले फोटो ट्विट केले. या साडी स्वॅगमध्ये प्रियंका गांधीसुद्धा उतरल्या. त्यांनीही लग्नातला साडीमधला फोटो शेअर केला. योगायोगानं १७ जुलैला प्रियंका आणि रॉबर्ट यांच्या लग्नाला बावीस वर्षं झाली. त्याचा फोटोही प्रियंका गांधींनी शेअर केला.