1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: बुधवार, 5 जुलै 2017 (17:24 IST)

रिलायन्स जिओ अव्वलच

रिलायन्स जिओने जूनमध्ये 18.8 Mbps च्या डाऊनलोड स्पीडसह पुन्हा एकदा सर्वात वेगवान 4G मोबाईल नेटवर्क सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. ट्रायने यासंदर्भातील माहिती आणि आकडेवारी जाहीर केली आहे. जिओचा जूनमध्ये सरासरी डाऊनलोड स्पीड 18.8 Mbps होता, तर मे महिन्याचा सरासरी डाऊनलोड स्पीड 19.12 Mbps होता. त्यामुळे एकंदरीतच इतर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांमध्ये जिओ सरस ठरते आहे. रिलायन्स जिओ भारतीय मोबाईल ब्रॉडबँड सेवा बाजारात गेल्या सात महिन्यांपासून इतर 4G मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांच्या तुलनेत सातत्याने पुढे आहे.

ट्रायच्या आकडेवारीनुसार 4G इंटरनेट स्पीड (जून 2017)

  1. रिलायन्स जिओ – 18.8 Mbps
  2. व्होडाफोन – 12.29 Mbps
  3. आयडिया – 11.68 Mbps
  4. एअरटेल – 8.23 Mbps