बुधवार, 3 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 5 जुलै 2017 (11:15 IST)

रिलायन्स जिओ 4 जी स्पीडमध्ये अव्वल !

Reliance Jio
टेलिकॉम क्षेत्रात इतर सर्व कंपन्यांना रिलायन्सने मागे टाकले आहे. अनेक कंपन्यांचे ग्राहक रिलायन्स जिओकडे जात आहेत. इतर सर्व कंपन्या यापासून हैराण असतानाच जिओ नवीन नवीन ऑफर आणून ग्राहकांना आकर्षित करत आहे.
 
स्पीडच्या बाबतीत रिलायन्स जिओने ग्राहकांना समाधानी केले आहे. 4G स्पीडच्या बाबतीत रिलायन्स जिओने इतर कंपन्यांना मागे सोडले आहे. ट्रायच्या अहवालानुसार रिलायन्स जिओ 4 जी स्पीडच्या बाबतीत लागोपाठ पाचव्या आठवड्यात पहिल्या स्थानावर आहे.