Widgets Magazine

जिओकडून 24 आणि 54 रुपयाचे प्लॅन लाँच

reliance jio
मुंबई| Last Modified बुधवार, 26 जुलै 2017 (09:34 IST)
रिलायन्स जिओनं 21 जुलैला आपला जिओ फीचर फोन लाँच केला. आता यासोबतच कंपनीकडून 24 रुपये आणि 54 रुपयांचे दोन नवे प्लॅनही आणले आहेत. त्यामुळेजिओच्या ग्राहकांना याचा फायदा होणार असल्याचे दिसत आहे.
24 रुपये किंमतीच्या प्लॅनमध्ये दोन दिवसांसाठी इंटरनेट डेटा मिळणार आहे तर 54 रुपयांच्या प्लॅनमध्ये एक आठवड्यासाठी इंटरनेट डेटा मिळणार आहे. जिओ फोनसाठी कंपनीनं वेबसाइटवर नोंदणी सुरु केली आहे. या फोनची प्री बुकिंग 24 ऑगस्टपासून सुरु होणार असली तरी त्यासाठी नोंदणी आत्ताच सुरु झाली आहे.


यावर अधिक वाचा :