1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By

जिओची परदेशात रोमिंग सेवा सुरु

reliance jio roaming services in Japan
रिलायन्सच्या जिओने आता परदेशातही रोमिंग सेवा सुरु केली आहे. आंतरराष्ट्रीय रोमिंगमध्ये 4 जी सेवा देणारी पहिली भारतीय कंपनी ठरली असून जपानच्या केडीडीआयशी हातमिळवणी केली आहे. यामुळे जपानहून भारतात येणाऱ्या आणि भारतातून जपानला जाणाऱ्या नागरिकांना दोन्ही देशांमध्ये नंबर न बदलता 4 जी सेवेचा लाभ घेता येणार आहे.

जपानी नागरिक भारतात इंटरनेट वापरासोबत व्हॉईस कॉलिंगही करू शकणार आहे. ही सेवा जिओ आणि केडीडीआयच्या वापरकर्त्यांनाच मिळणार आहे.