testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

स्मार्टफोनद्वारे मधुमेह नियंत्रित करणे शक्य

Last Modified सोमवार, 27 नोव्हेंबर 2017 (10:47 IST)

आता स्मार्टफोनद्वारेही मधुमेह नियंत्रित करता येऊ शकतो.

संशोधकांनी केलेला दावा असा की, विद्युतीय नेटवर्क निर्मिती करून मधुमेहावर स्मार्टफोनद्वारे नियंत्रण मिळवता येऊ शकते. मात्र, हे नियंत्रण मिळविण्याचीही एक प्रक्रिया आहे. त्यासाठी अर्थराइटिससारख्या आणि सेप्सिसराख्या धोकादायक संक्रमनांवर नियंत्रण मिळवावे लागते. जे पारंपरिक पद्धत अॅक्युप्रेशरपासून ते अत्याधुनिक इलेक्ट्रोपंक्चर, न्यूरोमॉड्यूलेशनद्वारेही करता येते.

न्यूरोमॉडयूलेशनमध्ये अतिवेदना, पेल्विक संबधी समस्यांपासून सुटकारा मिळवता योतो. त्यासाठी इलेक्ट्रिक साधनाच्या मदतीने प्रत्यारोपण केले जाते 'ट्रेड इन मॉलिक्यूलर मेडिसिन'मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, संशोधकांनी दावा केला आहे की, तांत्रिक प्रक्रियेची मदत घेऊन कोलाईटिस, मधुमेह, लठ्ठपणा, पॅक्रियेटायटिस, पॅरेलिसिस यांसारख्या आजारांवरही नियंत्रण मिळवता येते.

अमेरिकेतील रटजर्स यूनिवर्सिटीचे लुई अलोआ यांनी सांगितले की, 'आपले शरीर हे एखाद्या घराप्रमाणे आहे. ज्यात अनेक खोल्या असतात. अधारात घरामध्ये प्रवेश करताना आपल्याला जशी प्रकाशाची गरज असते. त्याचप्रमाणे, आपल्या शरीरालाही एका विशिष्ट स्थितीत विद्यूत नेटवर्कची आवश्यकता असते. ' पुढे बोलताना लुई अलोआ यांनी म्हटले की, छोट्या छोट्या प्रतिरोपणे विशिष्ट आजारांममध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात असे सांगितले आहे.यावर अधिक वाचा :