शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 21 सप्टेंबर 2019 (14:12 IST)

डिलिट फॉर ऑल केल्यानंतर देखील वॉट्सऐप मीडिया फाइल्स ऍक्सेस करू शकतात आयफोन यूजर्स

वॉट्सऐपच्या डिलिट फॉर इवरीवन फीचर्सला सुरू होऊन दोन वर्ष झाले आहे. या फीचर्सच्या मदतीने वॉट्सऐप यूजर आपली आणि रिसिपिएंटच्या  चॅटबॉक्सहून मेसेज डिलिट करू शकतो. हे मेसेज पाठवण्याच्या 7 मिनिटाच्या आत करावे लागते. वृत्तानुसार फीचरमध्ये आलेल्या खराबीमुळे काही आयफोन यूजर मीडिया फाइल डिलिट झाल्यानंतर देखील त्याला ऍक्सेस करू शकत आहे.  
 
सायबर सिक्योरिटी कंसल्टेंट शितेश साचनच्या रिपोर्टनुसार जेव्हा ही आयफोन किंवा एंडॉयड यूजर आपल्या डिवाइसने एखाद्या आयफोन यूजरला मीडिया फाइल पाठवतो आणि आणि मग त्याला हटवण्यासाठी डिलिट फॉर ऑल ऑपरेशन परफॉर्म करतो तरी देखील आयफोन यूजर फाइलला आपल्या कॅमेरा रोलमध्ये बघून घेतो. ही मीडिया फाइल फक्त चॅट विंडोने डिलिट होते.  
 
त्यांनी पुढे म्हटले की जेव्हा कोणता आयफोन यूजर वॉट्सऐप सेटिंगला डिफॉल्टवर ठेवतो, तर मीडिया फाइल ऑटोमॅटिकली त्याच्या कॅमेरा रोलमध्ये  डाउनलोड होऊन जाते. पण एंड्रॉयड डिवाइस यूजरच्या बाबतीत मीडिया फाइलवर डिलिट फॉर ऑल केल्याने फाइल फोन गॅलेरीतून डिलिट होऊन जाते.    अॅपलच्या कॅमेरा रोलला वॉट्सऐप ऍक्सेस नाही करू शकतो, अशात फाइल डिलिट केल्यानंतर देखील ती आयफोनमध्ये राहून जाते.  
 
याबद्दल वॉट्सऐपच्या सिक्योरिटी टीमचे म्हणणे आहे की हे फीचर योग्य प्रकारे काम करीत आहे. तसेच निश्चित वेळेत डिलिट फॉर ऑल प्रयोग केल्याने हे फाइलला वॉट्सऐप चॅट थ्रेडहून फाइल डिलिट करून देते. पण जर कोणी आयफोन यूजर सेव इमेज टू कॅमेरा रोल सिलेक्ट करतो तर हे वॉट्सऐपच्या   डिलिट फॉर ऑल फीचरच्या व्याप्तीतून बाहेर होऊन जाते.