शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: गुरूवार, 4 एप्रिल 2019 (08:02 IST)

जी मेलने आणले युजर्ससाठी काही खास फीचर्स

जी मेलने युजर्ससाठी काही खास फीचर्स आणले आहेत. गुगलने या न्यू जीमेलमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस व स्मार्ट कंपोज फीचर नव्याने जोडले आहेत. त्यामुळे युजर्सकडून पाठवण्यात येणाऱ्या ईमेलला आता आणखीन गती मिळणार आहे. तसेच आपण जीमेलच्या ऑफलाईन फीचरने इंटरनेट नसताना देखिल ईमेल पाठवू शकतो अशी सुविधा देण्यात आली आहे.
 
नज ( Nuge)फीचरमधून गुगलद्वारे युजर्स रिमाइंडर देण्यात आले आहे. त्यामुळे आपण कोणता ईमेल वाचला नाही अथवा कोणत्या ईमेलला रिप्लाय केला नाही त्याचे नोटिफीकेशन आपल्याला मिळतील. तसेच आणखी एक फीचर देण्यात आले आहे ज्यामध्ये एखाद्याला ई-मेल पाठवण्याची वेळ सुद्धा ठरवता येणार आहे. ज्याप्रमाणे फेसबुक, वर्ड प्रेस व लिंकडीनमध्ये आपण एखादी पोस्ट शेड्युल्ड करतो त्याप्रमाणे जीमेलमध्येसुद्धा आत आपण हव्या त्या वेळेनुसार इमेल शेड्युल्ड करुन ठेऊ शकतो. या फिचरमुळे आपल्याला हव्या त्या वेळेला आपण ई-मेल पाठवू शकतो. आपल्याला कोणाला इमेल पाठवायचा आहे हे आता लक्षात ठेवण्याची गरज नाही.