रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: मुंबई , रविवार, 15 मार्च 2020 (16:03 IST)

फेसबूक आणि व्हॉट्सएपलाही मागे टाकत टिक-टॉकचा नवा विक्रम

तरुणांमध्ये चांगलंच लोकप्रिय ठरलेल्या टिक टॉकने नवा विक्रम केला आहे (New record of TikTok App). फेब्रुवारी 2020 मध्ये टिकटॉक गूगल प्ले स्टोअरवर  आणि एपल एप स्टोअरवर (Apple App Store) सर्वाधिक वेळा डाऊनलोड करण्यात आलं आहे. सेन्सर टॉवरच्या (Sensor Tower report) अहवालानुसार उत्पन्न (रेव्हेन्यू) आणि वापर (इन्स्टॉल) दोन्हींमध्ये या महिन्यात टिकटॉकने बाजी मारली आहे. अशाप्रकारे आता टिक टॉक, व्हॉट्सएप आणि फेसबूकपेक्षा अधिक लोकप्रिय ठरलं आहे.

सेन्सरच्या अहवालानुसार मागील महिन्यात टिकटॉक एप भारतात सर्वाधिक वेळा डाऊनलोड करण्यात आलं. भारतातील एप डाऊनलोडची संख्या 4 कोटी 66 लाख इतकी आहे. ब्राझीलमध्ये हीच संख्या 97 लाख आणि अमेरिकेत 64 लाख आहे.

टिक टॉकला गूगल प्ले स्टोअरवर फेब्रुवारी 2020 मध्ये जवळपास 9 कोटी 32 लाख (93.2 मिलिअन) वेळा इन्स्टॉल करण्यात आलं. याआधी हे एप केवळ 1 कोटी 97 वेळा डाऊनलोड झालं होतं. टिक टॉक आल्यानंतर प्ले स्टोअर आणि एप स्टोअरवर एकूण 1.9 अब्ज वेळा इन्स्टॉल करण्यात आलं आहे.

फेब्रुवारी 2020 टिक टॉकसाठी सर्वाधिक कमाई करुन देणारा महिना ठरला आहे. टिक टॉकने या महिन्यात 5 कोटी 4 लाख डॉलरपेक्षा अधिक कमाई केली आहे. यात सर्वाधिक कमाई चीनमधून झाली आहे. यानंतर अमेरिका आणि ब्रिटनमधून कमाई झाली. भारतात हे एप सर्वाधिक वेळा डाऊनलोड झालं असलं तरी उत्पन्न देण्यात टॉपच्या देशांमध्ये भारताचा समावेश नाही.