शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. आयटीच्या जगात
Written By
Last Modified: शनिवार, 11 मार्च 2017 (16:43 IST)

व्हॉट्सअॅप जुने टेक्स्ट स्टेटस फीचर पुन्हा आणणार

व्हॉट्सअॅप जुनं टेक्स्ट स्टेटस फीचर पुन्हा आणण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सअॅप या फीचरची टेस्टिंग करत आहे. व्हॉट्सअॅप बीटा टेस्टर हे फीचर About नावानेही वापरु शकतात. अँड्रॉईडच्या 2.14.95 बीटा व्हर्जनवर जुनं स्टेटस ऑप्शन दिसत आहे. व्हॉट्सअॅपने अपडेट केलेल्या नव्या ‘स्टेटस’ फीचरबाबत अनेक युझर्स तक्रार करत आहेत. इन्स्टाग्रामच्या ‘स्टोरी’ सारखं स्टेटस फीचर बहुतांश युझर्सना आवडलं नाही.
 
जर तुम्ही बीटा युझर नसाल तर काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. पण तरीही तुम्हाला आताच या फीचरचा वापर करायचा असल्यास, बीटा टेस्टर म्हणून नोंदणी करुन, प्ले स्टोअरवर जाऊन बीटा व्हर्जन अपडेट करु शकता. पण व्हॉट्सअॅप लवकरच हे फीचर औपचारिकरित्या अपडेट करेल. जुन्या टेक्स्ट स्टेटस फीचरसाठी युझरला सेटिंग मेन्यूमध्ये जावं लागेल. यानंतर प्रोफाईल फीचरखालीच स्टेटस दिसेल. यावर क्लिक केल्यास युझर स्टेटस एडिट किंवा बदलू शकतात. आधीप्रमाणेच यावेळीही तुम्हाला काही डिफॉल्ट ऑप्शन दिसतील, जसे की Available, Busy, At school, At the movie. महत्त्वाचं म्हणजे जुन्या टेक्स्ट स्टेटससोबत नवं स्टेटस फीचरही कायम राहिल. फक्त नव्या फीचरचं नाव About असेल. त्यामुळे युझर आपल्या आवडीनुसार दोन्ही पर्यायांपैकी काहीही निवडू शकतात.