शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By
Last Modified: गुरूवार, 26 ऑगस्ट 2021 (17:53 IST)

श्रीकृष्ण जन्माष्टमी: चुकुनही करू नका ही कामे

जन्माष्टमीला भक्त दिवसभर उपवास करतात आणि श्री कृष्णाचे भजन-कीर्तन करतात. या दिवशी कृष्णाच्या बाल रूपाची पूजा केली जाते. हा दिवस देशातील प्रत्येक मंदिरासाठी खास आहे. या दिवशी देवाला पाळण्यात ठेवलं जातं. परंतु कृष्णाकडून इच्छित फल प्राप्तीसाठी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे.
 
स्वच्छ भांडी
भगवान श्रीकृष्णाची पूजा करताना स्वच्छ भांडी वापरवे. लक्षात ठेवा की ती भांडी कोणत्याही मांसाहारासाठी वापरली गेली नसावीत.
 
नवीन वस्त्र
जन्माष्टमीला देवाला नवीन वस्त्र घालावे. अनेकदा जुन्या वस्त्रांचे परिधना तयार केले जातात ते योग्य नव्हे. खरेदी करताना लक्ष असू द्यावं.
 
तुळशीची पाने तोडू नये
जन्माष्टमीच्या दिवशी चुकुनही तुळशीची पाने तोडू नयेत. श्रीकृष्ण भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात. श्रद्धेनुसार तुळशी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय आहे. म्हणून या दिवशी तुळस तोडणे योग्य नाही.
 
भात खाऊ नये
ज्यांना जन्माष्टमीचे व्रत नाही, त्यांनी या दिवशी भात खाऊ नये. एकादशी आणि जन्माष्टमीच्या दिवशी, तांदूळ आणि जवपासून बनवलेले अन्न खाण्यास मनाई आहे.
 
मास-मदिरा टाळावे
या दिवशी उपास करत नसला तरी मसालेदार किंवा तामसिक भोजन करणे टाळावे. या दिवशी घरात मास-मदिरा आणू नये.
 
कोणाचाही अनादर करू नका
कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोणाचाही अनादर करू नका. श्रीकृष्णांसाठी श्रीमंत किंवा गरीब सर्व भक्त समान आहेत. कोणत्याही गरीबांचा अपमान केल्याने भगवंत अप्रसन्न होऊ शकतात.