गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जन्माष्टमी
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (11:16 IST)

श्रीकृष्णाचा रंग रूप आणि सुवासाचे हे 4 गुपित आपल्याला आश्चर्यचकित करतील

भगवान श्रीकृष्णाचे रंग, रूप, सुवास आणि शारीरिक संरचनेवर संशोधन होतातच. अखेर त्यांचा रूप, रंग कसा होता हे जाणून घेणे अवघडच आहे.पण तरीही पुराणांचे शोध लावून आम्ही काही गोष्टी एकत्र केल्या आहेत.
 
1 ताठ आणि मऊ शरीर : असे म्हणतात की श्रीकृष्णाचं शरीर मुलींप्रमाणे मऊ होते पण युद्धाच्या वेळी त्यांचे शरीर प्रशस्त आणि कडक होऊन जात होते. एका आख्यायिकेनुसार हे घडण्याचे कारण असे होते की श्रीकृष्ण योगा आणि कलारीपट्टू विद्यांचे तरबेज होते. याचा अर्थ असा की श्रीकृष्णाला आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचे बनविणे माहीत होते. म्हणून मुलींप्रमाणे दिसणारे त्यांचे मऊ शरीर युद्धाच्या वेळी कठोर दिसू लागायचे. हीच गुणवत्ता कर्ण आणि द्रौपदीच्या शरीरात देखील होती.
 
2 मेघ श्यामला वर्ण : जनश्रुतीनुसार काही लोक श्रीकृष्णाचा रंग काळा तर काही लोक श्यामला रंगाचे मानतात. श्याम रंग म्हणजे काहीसा काळा रंग आणि काहीसा निळा. म्हणजे कळपट निळा. सूर्यास्तानंतर दिवस मावळताना आकाशाचा रंग काहीसा काळा निळा होतो. जनश्रुतीनुसार श्रीकृष्णाचा रंग न काळा असे न निळा. कळपट निळा पण नसे. त्यांचा त्वचेचे रंग श्यामला देखील नव्हते. वास्तविक त्यांच्या त्वचेचा रंग मेघ श्यामला असे. म्हणजे काळा, निळा आणि पांढरा मिश्रित रंग. म्हणून ते आकर्षित आणि देखणे दिसायचे.
 
3 श्रीकृष्णाचा सुवास: आख्यायिकेनुसार असं मानलं जातं की त्यांचा अंगातून मादक सुवास येत असे. या सुवासाला ते आपल्या गुप्त मोहिमेसाठी लपवून ठेवायचे. हीच गुणवत्ता द्रौपदीमध्ये देखील असे. द्रौपदीच्या शरीरातून देखील असाच सुवास येत असत ज्यामुळे लोक आकर्षित होत असत. प्रत्येक जण त्या सुवासाचा दिशेने बघत असायचे. म्हणून अज्ञातवासाच्या काळात द्रौपदीने चंदन, उटणं आणि अत्तराचे काम केलं ज्यामुळे तिला सैरेंध्री म्हणून ओळखायचे. असे म्हणतात की श्रीकृष्णाच्या शरीरातून येणारा सुवास गोपिकाचंदन आणि रातराणीच्या सुवासासारखा असायचा.
 
4 नेहमीच तरुण होते श्रीकृष्ण : जनश्रुतीनुसार भगवान श्रीकृष्णाने देह सोडली तेव्हा त्यांचा शरीरावरील केस पांढरे नव्हते आणि शरीरावर सुरकुत्या देखील नव्हत्या. म्हणजे तब्बल 119 वर्षाचे असून देखील ते चिरतारुण्य होते.